शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमआर’ने महसूल वाटा ५.७६ वरुन १४.४९ टक्के केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:00 IST

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशातील सहा विमानतळांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली. त्यातून सरकारला २३०० कोटींचा महसूल मिळेल व विमानन क्षेत्रात १३ हजार कोटींची खाजगी गुंतवणूक होईल असेही सीतारामन म्हणाल्या.

ठळक मुद्देनागपूर विमानतळ खाजगीकरणाचा बोजवारा

सोपान पांढरीपांडेनागपूर : वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशातील सहा विमानतळांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली. त्यातून सरकारला २३०० कोटींचा महसूल मिळेल व विमानन क्षेत्रात १३ हजार कोटींची खाजगी गुंतवणूक होईल असेही सीतारामन म्हणाल्या.यापूर्वीही सरकारने २०१९ साली सहा विमानतळांचे खाजगीकरण केले होते. त्यात नागपूर विमानतळाची जागतिक निविदादेखील होती. या निविदेसाठी हैदराबादच्या ‘जीएमआर एअरपोर्टस्’ने ५.७६ टक्के महसूल वाटा सरकारला देण्याची बोली लावली होती. तर ‘जीएमआर’चे स्पर्धक असलेल्या ‘जीव्हीके एअरपोर्ट मॅनेजमेन्ट’ने फक्त ३.०६ टक्के महसूल वाटा देण्याची बोली लावली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये ‘जीएमआर’ची बोली सर्वाधिक असल्याने सरकारने नागपूर विमानतळ पुढील ३० वर्षे चालविण्यासाठी देऊन टाकले.व्यवहार संशयास्पदहा सर्व व्यवहार भयंकर संशयास्पद होता. कारण ‘जीएमआर एअरपोर्टस्’ला फक्त १४०० हेक्टरवरचे नागपूर विमानतळ व त्याशिवाय शहरालगतच्या १०० हेक्टर जागेवर शॉपिंग मॉल, पंचतारांकित हॉटेल्स, करमणूक केंद्र, रेस्टॉरेन्ट्स चालवायला मिळणार होते. वार्षिक ३६ कोटींच्या मोबदल्यात शेकडो कोटी रुपयांचा मलिदा ‘जीएमआर एअरपोर्टस्’ला ३० वर्षे मिळणार होता.‘लोकमत’ने या प्रकरणाची चौकशी केली असता ‘जीएमआर’ने यापूर्वी नवी दिल्ली विमानतळासाठी ‘फ्लापोर्ट राजी’ या जर्मन व ‘ईरामन’ या मलेशियन कंपनीला सोबत घेऊन ‘एअरपोर्टस् ऑथोरिटी’ची २६ टक्के भागिदारी दिली होती. शिवाय या कंपनीने दिल्ली विमानतळाच्या संचालनासाठी ४० टक्के महसूल वाटा दिला होता असेउघडकीस आले.मजेची बाब म्हणजे नागपूर विमानतळासाठी ‘जीएमआर’ने कुठल्याही विदेशी कंपनीला सोबत घेतले नाही व ‘एअरपोर्टस् ऑथोरिटी’लाही डावलल्याचे उघडकीस आले आहे. सरकारला ५.७६ टक्के वाटा देऊन ९४.२४ टक्के वाटा लाटण्याचा ‘जीएमआर’चा प्रयत्न होता.हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘लोकमत’ने आघाडी उघडली व २७-२८ ऑक्टोबर २०१८ असे दोन दिवस विमानतळ खाजगीकरणाची संशयास्पद निविदा रद्द करा अशी मागणी केली. इतकेच नव्हे तर ६ नोव्हेंबर २०१८ ला ‘लोकमत’ने ‘देश बुडवणारे नवे पाऊल’ हा अग्रलेख लिहून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केली.‘लोकमत’च्या दणक्यामुळे ‘जीएमआर एअरपोर्टस्’वर प्रचंड दबाव आला व कंपनीने महसूल वाटा ५.७६ टक्क्यावरुन १४.४९ टक्क्यांपर्यंत वाढविला. विशेष म्हणजे ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने अजून नागपूर विमानतळाचा ताबा ‘जीएमआर एअरपोर्टस्’ला मिळालेला नाही.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन