शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

३६४२ अवैध बांधकामे पाडण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन द्या : हायकोर्टाचा मनपाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी हायटेंशन लाईनजवळील ३६४२ अवैध बांधकामांसंदर्भात पुन्हा एक प्रभावी आदेश जारी केला. ही अवैध बांधकामे पाडण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्यात यावा असे या आदेशाद्वारे महापालिकेला सांगण्यात आले.

ठळक मुद्देहायटेंशन लाईनजवळ नियमांची पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी हायटेंशन लाईनजवळील ३६४२ अवैध बांधकामांसंदर्भात पुन्हा एक प्रभावी आदेश जारी केला. ही अवैध बांधकामे पाडण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्यात यावा असे या आदेशाद्वारे महापालिकेला सांगण्यात आले. याकरिता महापालिकेला ३ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ३१ मे २०१७ रोजी प्रियांश व पीयूष धर ही जुळी मुले आरमर्स बिल्डर्सच्या सुगतनगर, नारा येथील गृह प्रकल्पातील एका सदनिकेच्या गॅलरीत खेळताना हायटेंशन लाईनच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, न्यायालयाने शहरातील हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविणे यासाठी विशेष समिती स्थापन केली. त्या समितीने ३१ मे २०१९ पर्यंत दोन तृतीयांश शहरातील हायटेंशन लाईनचे सर्वेक्षण पूर्ण करून पाचवा अहवाल सादर केला. त्यानुसार, हायटेंशन लाईनजवळ मंजूर आराखड्याशिवाय ३२०४ बांधकामे करण्यात आली आहेत तर, उर्वरित ४३८ ठिकाणी मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेला ही सर्व अवैध बांधकामे कायद्यानुसार पाडायची आहेत.आरमर्स बिल्डर्सच्या गृह प्रकल्पातील ११ रहिवाशांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून या प्रकल्पातील अवैध बांधकामाला संरक्षण प्रदान करण्याची मागणी केली होती. गेल्या सोमवारी न्यायालयाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. अवैध बांधकाम पाडल्यानंतर झालेले नुकसान भरून निघू शकते, पण हायटेंशन लाईनच्या संपर्कात येऊन गेलेला प्राण परत येऊ शकत नाही. त्यामुळे हायटेंशन लाईनजवळची अवैध बांधकामे कायम ठेवली जाऊ शकत नाही. मालमत्तेपेक्षा प्राण जास्त महत्त्वाचा आहे असे मत न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले होते. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून इतर पक्षकारांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. शैलेश नारनवरे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक, अ‍ॅड. गिरीश कुंटे आदींनी कामकाज पाहिले.‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम : सर्वेक्षण करण्याचा आदेशउच्च न्यायालयाने ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन शहरातील किती शाळा-महाविद्यालयांना हायटेंशन लाईनमुळे धोका होऊ शकतो अशी विचारणा केली. तसेच, हायटेंशन लाईनजवळच्या शाळा-महाविद्यालयांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विशेष समितीला दिले.दाभा येथील सेंटर पॉईन्ट स्कूल हायटेंशन लाईनजवळ असून शाळेची इमारत बांधताना नियमांचे पालन झाले नाही अशी बातमी ‘लोकमत’ने काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केली होती. अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी ती बातमी न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणली होती. त्यांनी गुरुवारी पुन्हा त्या बातमीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व यासंदर्भात आवश्यक आदेश जारी करण्याची विनंती केली. परिणामी, न्यायालयाने वरील निर्देश दिले. याचिकेतील माहितीनुसार, शहरातील २५ शाळा-महाविद्यालये हायटेंशन लाईनजवळ आहेत. शाळा-महाविद्यालयाच्या इमारतींचे बांधकाम करताना मंजूर आराखड्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. कायद्यानुसार, हायटेंशन लाईनखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तसेच, कोणत्याही इमारतीवरून हायटेंशन लाईन टाकता येत नाही. ६५० व्होटस्पेक्षा जास्त व ३३ हजार व्होल्टस्पेक्षा कमी दाबाची वीज वाहिनी एखाद्या इमारतीवरून जाणार असल्यास इमारतीचे छत व वीज वाहिनीमध्ये ३.७ मीटर तर, आडव्या बाजूने २ मीटर अंतर असणे आवश्यक आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका