शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम-नागपूर’चे ‘गेट सेट गो’

By admin | Updated: June 11, 2015 02:59 IST

‘आयआयएम-नागपूर’ मध्ये यंदापासूनच प्रवेश सुरू होणार असून याबाबत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

संकेतस्थळ सुरू : ६० विद्यार्थ्यांची पहिली ‘बॅच’, जुलैपासून सुरू होणार वर्गयोगेश पांडे नागपूर ‘आयआयएम-नागपूर’ मध्ये यंदापासूनच प्रवेश सुरू होणार असून याबाबत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. संस्थेचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे याबाबत देशभरातील विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी ‘आयआयएम-नागपूर’चे अधिकृत संकेतस्थळदेखील तयार करण्यात आले आहे. येथे संस्थेतील प्रवेशक्षमता, नागपूर, वसतीगृह इत्यादीबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या हे संकेतस्थळ प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आले असले तरी यात लवकरच मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे ‘आयआयएम-नागपूर’ला (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) हिरवी झेंडी मिळाल्यानंतर मुख्य इमारत मिहानमध्ये स्थापन होणार हे स्पष्ट झाले होते. ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे नागपूरमधील संस्थेचे पालकत्व देण्यात आले आहे व २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासूनच येथे वर्ग सुरू होणार असल्याचेदेखील मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तात्पुरत्या स्वरूपात ‘व्हीएनआयटी’च्या परिसरातील दोन इमारतींमध्ये वर्ग सुरू होणार आहेत. ‘आयआयएम-नागपूर’च्या वर्गखोल्यांचे स्वरूप, ग्रंथालय, संगणक कक्ष, कॅन्टीन, कार्यालय, शिक्षकांचे कक्ष, अभ्यासकक्ष यांचे स्वरूप, तेथील फर्निचर इत्यादीबाबत केंद्रीय समितीने सूचनादेखील दिल्या होत्या.‘आयआयएम’सारखी संस्था असल्यामुळे याचे वेगळे संकेतस्थळ कधी तयार होणार याची विद्यार्थ्यांकडून विचारणा करण्यात येत होती. याबाबत ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राथमिक स्वरूपाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. तूर्तास संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर ‘व्हीएनआयटी’चे छायाचित्र दिसून येत आहे. संबंधित संस्था सुरुवातीला ‘व्हीएनआयटी’ला व तीन वर्षांनी स्वत:च्या इमारतीत जाणार असल्याचे माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.पहिल्या ‘बॅच’साठी एकच अभ्यासक्रम‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या बॅचमध्ये ६० विद्यार्थी राहणार आहेत. देशातील काही ‘आयआयएम’मध्ये एकहून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात ‘पीजीपीएम’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट), ‘पीजीपी-एबीएम’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेन्ट), ‘एफपीएम’ (फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट), ‘पीजीपीएक्स’ (वन इअर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट फॉर एक्झिक्युटिव्ह) यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परंतु ‘आयआयएम-नागपूर’चे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे येथे ‘पीजीपीएम’ हाच अभ्यासक्रम राहणार आहे. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क अद्याप निश्चित झाले नसले तरी याचा आकडा ८ ते १० लाखांच्या घरात जाण्याचे संकेत संस्थेतर्फे देण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. दर्जा कायम राखण्यावर भरजोपर्यंत ‘आयआयएम-नागपूर’ मिहान येथील स्वत:च्या इमारतीत जात नाही तोपर्यंत ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे पालकत्व कायम राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती ही लांबलचक व वेळखावू प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘आयआयएम-अहमदाबाद’ येथील तज्ज्ञ शिक्षकच येथे वर्ग घेणार आहेत. शिवाय काही ‘व्हिजिटिंग’ प्राध्यापकदेखील राहतील. ‘आयआयएम’च्या शिक्षणप्रणालीचा दर्जा कायम राहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही असे एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केले.