लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्न ठरल्यानंतर अचानक रिसॉर्टमध्ये लग्न करण्याचा अट्टाहास करत तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याची धक्कादायक घटना जरीपटका परिसरात उघडकीस आली आहे. हुंडा देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी संगनमताने लग्न मोडून फिर्यादीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणीचे उमेश नीलकंठ देशभ्रतार (वय ३२, रा. कोंढाळी, ता. काटोल, जि. नागपूर) याच्यासोबत लग्न जुळले होते. त्यानुसार दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत साक्षगंध कार्यक्रमही पार पडला होता. २२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आरोपी उमेश देशभ्रतार याने फिर्यादीला वारंवार फोन करून, रिसॉर्टमध्ये लग्न करावे लागेल; अन्यथा तीन लाख रुपये द्यावे लागतील. जर असे केले नाही तर लग्न होणार नाही, असे म्हटले.
मागणीला आरोपीची आई निरंजना देशभ्रतार (वय ५२) व भाऊ हर्षल देशभ्रतार (वय २८) यांनीही साथ देत संगनमताने हुंड्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तरुणीने हुंडा देण्यास ठाम नकार दिल्यानंतर आरोपींनी लग्न मोडून टाकत तिचा मानसिक छळ केला. या प्रकारामुळे तरुणी व तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला. तरुणीने हिंमत दाखवून जरीपटका पोलिस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Nagpur: A wedding was called off after the groom's family demanded ₹3 lakh dowry to hold the ceremony at a resort. The bride refused, leading to mental harassment and a police complaint against the groom and his family.
Web Summary : नागपुर: एक शादी इसलिए टूट गई क्योंकि दूल्हे के परिवार ने समारोह को एक रिसॉर्ट में आयोजित करने के लिए ₹3 लाख दहेज की मांग की। दुल्हन ने इनकार कर दिया, जिससे मानसिक उत्पीड़न हुआ और दूल्हे और उसके परिवार के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई गई।