शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण व शहरी आराेग्य व्यवस्थेची दरी कमी हाेणे आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:20 IST

Draupadi Murmu News: आरोग्य सेवा क्षेत्र बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे.

नागपूर - आरोग्य सेवा क्षेत्र बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आपण हे बदल आत्मसात करून तंत्रज्ञानाच्या उपयोगाने ग्रामीण व शहरी आरोग्य सुविधांची दरी कमी करणे व सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले. 

केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय दीक्षांत समारंभ बुधवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासह राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही.

पाच किमीच्या परिघात वैद्यकीय सुविधा : मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत १५ हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू केल्याचे सांगितले. पाच किमीच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

२१० विद्यार्थ्यांना पदवीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विविध कोर्सेसमध्ये अव्वल आलेल्या आठ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. त्यानंतर दीक्षांत समारंभात २१० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये १२९ एमबीबीएस, २९ एमडी/एमएस, ३५ बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग, ५ एम.एस्सी. आणि १२ संलग्न व आरोग्यसेवा शाखांतील पदवीधरांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bridge rural-urban health gap: President Murmu at AIIMS Nagpur.

Web Summary : President Murmu emphasizes bridging the rural-urban health gap through technology at AIIMS Nagpur convocation. CM Fadnavis highlighted efforts to provide medical facilities within 5km radius. 210 students received degrees, awards presented.
टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूnagpurनागपूर