शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेविना पित्तनलीकेच्या आत जाऊन फोडले खडे

By सुमेध वाघमार | Updated: March 31, 2024 18:19 IST

‘सुपर’मधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग : १५वर वयोवृद्ध रुग्णाना वाचविले जीवघेणा त्रासातून

नागपूर: पित्ताशयात खडे असणाºया पाच टक्के रुग्णांमध्ये पित्तनलिकेत खडे होण्याची शक्यता असते. जे रुग्ण सत्तरी व त्यापुढील वयोगटातील असतात त्यांना यावर शस्त्रक्रिया करणे धोक्याचे ठरते. त्यांच्यासाठी ‘स्पायग्लास सिस्टीम’च्या मदतीने ‘कोलांजियोस्कोपी’ केली जाते. मध्यभारतातील शासकीय रुग्णालय असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात पहिल्यांदाच १५ वयोवृद्ध रुग्णांंवर ही यशस्वी प्रक्रिया करून त्यांना जीवघेण्या त्रासातून वाचविले. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२१ मध्ये विभागातील ओपीडीत ११,८१५ रुग्णांची नोंद असताना २०२३ मध्ये ही संख्या वाढून १५,९७० वर पोहचली आहे. वारंवार होणारा पित्ताचा त्रास, अन्नग्रहण केल्यानंतर छातीत होणाºया वेदना, भोजनानंतर ढेकरा बरोबर अन्नाचे अंश येणे, संडासच्या तपासणीमध्ये रक्ताचे अंश आढळणे, जठराचा कर्करोग, अन्नलिकेत अडकलेल्या वस्तू काढण्यापासून ते इतरही समस्यांचे निदान व उपचारासाठी गॅस्ट्रोस्कोपीचा वापरही वाढला आहे. २०२० मध्ये १,५०० रुग्णांची गॅस्ट्रोस्कोपी केली असताना २०२३ मध्ये याच्या दुप्पट ३,४०० रुग्णांवर याचा वापर झाला आहे. २०२० मध्ये पित्ताशयातील खडे काढण्याचा १२१ असताना २०२३ मध्ये २६० प्रक्रिया झाल्या.

‘कोलोरेक्टल’ कर्करोगासह इतरही आजाराचे निदान करण्यासाठी वापरण्यात येणाºया ‘कोलोनोस्कोपी’ची संख्याही वाढली आहे. २०२०मध्ये १४५ झाल्या असताना २०२३मध्ये ३८८ प्रक्रिया झाल्या. विभागात भरती रुग्णांची संख्याही वाढली आहे. २०२१ मध्ये ७६९ असताना २०२३ मध्ये १२७९वर पोहचली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अमोल समर्थ यांनी ‘स्पायग्लास सिस्टीम’ प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केल्याने विदर्भासह मध्यभारतातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरण्याची शक्यता आहे.

 -‘स्पायग्लास सिस्टीम’ अशी करते कामपूर्वी ‘कोलेंजिओस्कोपी’साठी वापरण्यात येणारे एंडोस्कोप अतिशय नाजूक आणि वापरण्यास कठीण होते. परंतु ‘स्पायग्लास सिस्टीम’ही पित्तविषयक नलिका प्रणाली आणि स्वादुपिंडात पोहोचण्यास अवघड असलेल्या लहान नलिका पाहू देते. तंतोतंत रंगीत प्रतिमा तयार करते ज्यामुळे डॉक्टर एकाच प्रक्रियेत निदान आणि उपचार करू शकतात. मागील महिन्यात एका सामाजिक संस्थेने ‘स्पायग्लास सिस्टीम’ तीन दिवसांसाठी उपलब्ध करून दिल्याने सत्तरी गाठलेल्या १५वर रुग्णांना याचा लाभ झाला. हे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती डॉ. समर्थ यांनी दिली. 

 -लवकरच ‘स्पायग्लास सिस्टीम’ येईल‘सुपर’च्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात लवकरच ‘स्पायग्लास सिस्टीम’ येईल. त्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ‘स्पायग्लास’च्या मदतीने ‘कोलेंजिओस्कोपी’ केल्यास पित्तनलिकेतील अनेक आजाराचे निदान व उपचार करणे शक्य आहे. -डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर