शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी निर्मूलनासाठी ‘गडचिरोली पॅटर्न’ कौशल्य विकास कार्यक्रम

By admin | Updated: May 9, 2014 00:10 IST

नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे.

नागपूरसह पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड

आनंद डेकाटे - नागपूर

नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे. ज्या बेरोजगारीच्या संघर्षातून नक्षली घडतात त्या बेरोजगारीला संपविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याने राबविलेल्या पॅटर्नची आता सर्वांनीच दखल घेतली आहे. बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न आता होणार आहे. त्यासाठी राज्यातील पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असून, यात नागपूरचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्हा उद्योगातही मागास आहे. परंतु या संकटातच समोर जाण्याचा मार्गही गवसला.

गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची योजना आखण्यात आली. या योजनेनुसार बेरोजगार युवकांची नोंदणी करणे. त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा शोध घेणे. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देणे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणे, अशी ही योजना होती. त्यासाठी खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. हॉस्पिटॅलिटी, आॅटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन असे तीन व्यवसाय निवडण्यात आले. या व्यवसायात ज्या बेरोजगारांमध्ये थोडेफार कौशल्य असेल त्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले. सर्वात अगोदर १४८३ बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करून त्यांचे कौन्सिलिंग करण्यात आले. त्यापैकी १२८२ उमेदवारांची टेस्ट घेण्यात आली. ९१४ उमेदवारांची प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यापैकी ४२४ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यातून ३७२ बेरोजगारांना नोकरी उपलब्ध झाली. हा एक छोटेखानी प्रयत्न गडचिरोलीत यशस्वीपणे राबविण्यात आला.

राज्य शासनानेसुद्धा याची गंभीरतेने दखल घेतली आहे. ‘गडचिरोली पॅटर्न’च्या धर्तीवर हा प्रकल्प आता संपूर्ण राज्यात लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या माध्यमातून नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सांगली आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यासंबंधात लवकरच शासनातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहे. असा असेल ‘कौशल्य विकास कार्यक्रम’ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्यांचे कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष खासगी आस्थापनाद्वारे त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे. गावपातळीवर जाऊन बेरोजगार तरुणांशी संपर्क साधणे, त्यांच्यातील व्यवसायाच्या दृष्टीने असलेल्या कौशल्याची माहिती करून घेणे. ते कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, याबाबत कौन्सिलिंग करणे, प्रशिक्षणाद्वारे त्याला नोकरीसाठी सक्षम करणे.