शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लळा लागलेले अंकुर गर्भातच करपले..!

By admin | Updated: July 1, 2014 00:49 IST

ज्याच्यावर विश्वास ठेवून जीव ओवाळला, त्यानेच तिला अंधारवाटेवर एकटे सोडून दिले. पोटात वाढणारा गर्भ खुडून टाक, असा सल्ला अनेकांनी दिला. मात्र तो तिला मान्य नव्हता. तिला जगायचं होतं गर्भातील

प्रियकराने दिला दगा : कुमारी मातेची करुण कहाणीसंतोष कुंडकर - चंद्रपूरज्याच्यावर विश्वास ठेवून जीव ओवाळला, त्यानेच तिला अंधारवाटेवर एकटे सोडून दिले. पोटात वाढणारा गर्भ खुडून टाक, असा सल्ला अनेकांनी दिला. मात्र तो तिला मान्य नव्हता. तिला जगायचं होतं गर्भातील अंकुरासाठी ! अब्रुसाठी कुटुंबानेही घराबाहेर काढल्यानंतर तिला चंद्रपुरातील महिला सुधारगृहात आश्रय मिळाला. अशातच जिल्हा शासकीय रुग्णालयात तिचे बाळांतपण झाले. मात्र पोटच्या गोळ्याचे निपचित पडलेलं कलेवर पाहून तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. एका दुर्दैवी कुमारी मातेची ही कहाणी संवेदनशील मनाला वेदना देऊन गेली. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आंबोली येथील गंगा (काल्पनिक नाव) आणि अंकुश जांभुळे या दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबध होते. आयुष्याच्या एका भावनिक वळणावर तिची अन् त्याची भेट झाली. ओळखीच्या धाग्याने मैत्रीच्या गाठी घट्ट बांधल्या गेल्या अन् या दोघांच्या प्रितीचा सुगंध रानोमाळ दरवळला. तिने त्याच्यावर निरागसपणे सच्चे प्रेम केले. मात्र त्याच्या मनातील स्वार्थ गंगाला ओळखता आला नाही. त्याने तिच्या भोळेपणाचा फायदा घेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्याला जेव्हा हे कळले तेव्हा तो पार बदलून गेला. गंगाच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाचे पितृत्व नाकारत त्याने लग्न करण्यास सरळ नकार दिला. त्याच्या नकाराने ती अंतर्बाह्य हादरून गेली. पुढे त्याने कामठी येथील एका मुलीशी गुपचूप लग्न करण्याचा घाट घातला. याची खबर मिळताच, गंगाने थेट भिसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची तुरूंगात रवानगी केली.इकडे तिच्या पोटातील गर्भ वाढत होता. काहींनी तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र पोटातल्या अंकुरासाठी तिला जगायचं होतं. त्याला जन्म द्यायचा होता. समाजात नाचक्की झाली म्हणून घरच्यांनीही तिला घराबाहेर काढले. पोलिसांच्या मदतीने तिला चंद्रपूरच्या महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. दोन दिवसांपूर्वी प्रसवकळा सुरू झाल्याने तिला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिने मृत बाळाला जन्म दिला अन् क्षणात तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. तिच्या गगनभेदी आक्रोशाने उपस्थितांचीही मने द्रवली.