शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुलींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 16:35 IST

Nagpur News मध्यभारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलाखोंचे शेअर स्वत:च्या नावे केले पुतण्याची पोलिसांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - मध्यभारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मोहब्बतसिंग यांच्या पुतण्यानेच फसवणुकीची ही तक्रार पोलिसांत नोंदविली, हे विशेष.अजिंदरसिंग गुरुलालसिंग तुली (वय ६०, रा. क्लॉर्क टाऊन) असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते मोहब्बतसिंग यांचे पुतणे असल्याचे समजते. त्यांनी मोहब्बतसिंग कपूरसिंग तुली यांच्यासोबत २ जुलै २०११ ला गांधीबाग ईतवारीत बॉम्बे गुडस् ट्रान्सपोर्ट गॅरेज कंपनी सुरू केली होती. भारत सरकार मंत्रालय कंपनी रजिस्ट्रर मुंबई येथील कार्यालयात ग्रेट रोडवेज प्रा. लि. कंपनीच्या नावाने नोंदणी करण्यात आली.

या कंपनीत फिर्यादी अजिंदरसिंग १९९४ पासूनच कार्यरत होते. कंपनीच्या स्थापनेनंतर अजिंदरसिंग यांनी कंपनीच्या नावे ७५ टक्के शेअर्स खरेदी केले होते. कंपनीत अजिंदरसिंग यांचे वडील गुरुलालसिंग कपूरसिंग तुली (मोहब्बतसिंग यांचे बंधू ) हे सुद्धा संचालक होते. त्यांनी ग्रेट रोडवेज कंपनीच्या नावाने १७,५०० शेअर्स खरेदी केले होते. अशाप्रकारे अजिंदरसिंग आणि त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण २२, ५०० शेअर्स होते. अजिंदरसिंग यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अजिंदरसिंग यांनी घरातील कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांना स्वत:च्या आणि वडिलांच्या नावे असलेल्या २२, ५०० शेअर्सबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी कंपनीत विचारपूस केली असता ते शेअर्स मोहब्बतसिंग तुली यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना कळले. याबाबत अजिंदरसिंग यांनी मोहब्बतसिंग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दाद दिली नसल्याचे समजते. कोणताही करार किंवा निर्णय झाला नसताना मोहब्बतसिंग यांनी अजिंदरसिंग यांचे शेअर्स आपल्या नावाने करून आपला विश्वासघात केल्याची भावना झाल्यामुळे अजिंदरसिंग यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रे तपासल्यानंतर तहसील पोलिसांनी सोमवारी मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.साथीदार कोण ?फसवणुकीच्या या प्रकरणात पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हणून मोहब्बतसिंग यांचेच नाव दिले आहे. मात्र, कलम ३४ ही लावले आहे. त्यामुळे या फसवणुकीत मोहब्बतसिंग यांच्यासोबत आणखी आरोपी असल्याचे स्पष्ट होते. ते दुसरे आरोपी किती आणि कोण, ते मात्र पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजी