शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुन्हेगारांसह चार गजाआड

By admin | Updated: January 23, 2015 02:52 IST

गुन्हेशाखा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना अटक केली. यात एका कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना अटक केली. यात एका कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लकडगंज आणि तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काँक्रिट मशिनसह अन्य साहित्य चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्हेशाखेच्या पथकाने भीमबली घनाराम जांगडे (वय २२, रा. मिनीमातानगर) याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेल्या मशिन आणि अन्य साहित्यांसह ४ लाख, २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुख्यात गुन्हेगार आसिफ इसराईल अंसारी (वय २२, रा. उमरेड रोड) याला अटक करून अ‍ॅक्टिव्हा तसेच सीडीडॉन मोटरसायकल जप्त केली. पाचपावली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या होत्या.
सागर राजेश श्रीवास (वय २२, रा. जयरामनगर, यवतमाळ) तसेच विशाल विजयराव देवगडे (वय १९, रा. महाल) या दोघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, दोन मोबाईल हॅण्डसेट तसेच अन्य चीजवस्तूंसह ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हेशाखेचे पोलीश निरीक्षक अविनाश शिळीमकर, एस.एम.गायकवाड, सी.पी. ढोले, एपीआय अतुलकर, दिनेश दहातोंडे, पीएसआय के.आर. सिंग, हवालदार मिलिंद मून, संजय देवकर, नायक गोपाल देशमुख, सतीश निमजे, रामकैलास यादव, अमित भुरे, बादल मांढरे आणि सुनील वानखेडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)