शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी माजी राज्यमंत्र्यांची भटकंती

By admin | Updated: May 19, 2014 00:54 IST

आजचे राजकारण अर्थप्राप्तीचे सर्वात मोठे माध्यम आहे. एकदा आमदार म्हणून जरी निवडून आला, तरी तो आयुष्यभराची पुंजी गोळा करतो. राज्याचा मंत्री म्हटल्यावर तर काही सांगायलाच नको.

 शस्त्रक्रियेसाठी हवे १२ लाख रुपये : यशवंत निकोसे यांची व्यथा

नागपूर : आजचे राजकारण अर्थप्राप्तीचे सर्वात मोठे माध्यम आहे. एकदा आमदार म्हणून जरी निवडून आला, तरी तो आयुष्यभराची पुंजी गोळा करतो. राज्याचा मंत्री म्हटल्यावर तर काही सांगायलाच नको. मात्र एका मंत्र्याला आपल्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी केवळ १० लाख रुपयांची मदत गोळा करायला भटकावे लागत असेल तर आश्चर्यच म्हणावे लागेल. हे सत्य आहे. उत्तर प्रदेशात बसपाच्या सुप्रीमो मायावती यांच्या सरकारमध्ये २००७ ते २०१२ या काळात सांस्कृतिक राज्यमंत्री असलेले यशवंत निकोसे यांच्यावर ही वेळ आली आहे. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा तनिष्क हा जन्मापासून ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त आहे. त्याचावर उपचार सुरू आहे. मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. २६ मे पर्यंत त्यांना पैसे गोळा करावे लागणार आहे. यशवंत निकोसे हे मूळचे नागपूरचे आहेत. गड्डीगोदाम येथे आजही त्यांचे टीनाचे घर आहे. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या प्रेरणेने ते उत्तर प्रदेशात स्थायिक झाले. दरम्यान ते नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा येथे कार्यरत होते. पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केल्याने मायावती यांनी निकोसेंना उत्तर प्रदेश फिल्म डिव्हीजनचे संचालक म्हणून सन्मान दिला. त्यांना सांस्कृतिक राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. सलग पाच वर्षे आपले काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. मंत्रिपदाचा गैरवापर केला नाही. एका पैशाची अफरातफर केली नाही. निव्वळ पक्षासाठी काम करण्यात त्यांचे आयुष्य गेले. आजही लखनौ येथे ते एका भाड्याच्या घरात राहतात. इतरांप्रमाणे आपण पैसा कमाविला नाही, याची त्यांना कुठलीही खंत नाही. मुलाच्या आॅपरेशनसाठी त्यांनी अनेकांकडे मदत मागितली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. महिन्याभरापूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने, ते नागपुरात आले. मुलाच्या शस्त्रक्रियेची तारीख जवळ येत असल्याने, पैसा गोळा करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. मुलाच्या मदतीसाठी राज्यमंत्री राहिलेल्या या ’आम आदमी’ला भटकंती करावी लागत आहे. (प्रतिनिधी)