शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्री म्हणतात, नामकरणावरून होत असलेला वाद दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ...

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान करावे, अशी आदिवासी बांधवांची मागणी होती, असे चित्र निर्माण करून दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.

या उद्यानात केवळ २० टक्केच भागाचे उद्घाटन होत आहे. या उद्यानात आणखी सफारी, नाइट सफारी, जैवविविधता उद्यान हे उपक्रम आहेत. भविष्यात येथे आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, जीवनमान याबाबत सर्वसमावेशक असे ‘गोंडवाना थीम पार्क’ करण्याचे नियोजन केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी वादाच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे स्वत: पर्यावरणप्रेमी व वन्यजीवप्रेमी होते. एवढेच नव्हेतर सर्व ठाकरे कुटुंबीय हे पर्यावरणप्रेमी व आदिवासी समाजाचे हितच पाहणारे आहेत. मागील दहा वर्षांपासून हे पार्क बनविण्याच्या केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही.

...तर तेव्हाच नाव का दिले नाही

गोंडवाना नाव देण्याचा कुठेही प्रस्ताव शासनाकडे कधीच नव्हता, असेही राठोड यांनी म्हटले आहे. असा प्रस्ताव होता तर तेव्हाच नाव का दिले नाही, याचे उत्तर विरोधकांना देता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला प्रत्यक्ष विरोध करण्याची हिंमत नसल्याने आदिवासी समाजाचा वापर करून अप्रत्यक्ष विरोध करू नका, असे आवाहनही वनमंत्री राठोड यांनी केले आहे.

...