शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : खोटारडेपणा नको, लॉकडाऊन पाळा, अन्यथा...; तुकाराम मुंढेंनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 18:38 IST

आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला.

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्भवत असलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. लॉकडाऊन असताना आणि प्रशासन वारंवार बजावत असतानाही नागरिक खोटे कारण सांगून विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. सीताबर्डी, कॉटन मार्के ट अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. सध्या नागपुरात कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित १० रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे.कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंदविशेष म्हणजे नागरिक गर्दी करीत असल्यामुळे आजपासून कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठविता शहरातील विविध भागात पाठविण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही मुंढे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtukaram mundheतुकाराम मुंढे