शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांची कालमर्यादा पाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी महसूल यंत्रणेच्या ...

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. त्यासाठी विकास कामांची कालमर्यादा पाळा, अशा सूचना नव्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्यात.

नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामामधून जनतेला अधिक लोकाभिमुख व परिणामकारक प्रशासन देण्याला प्राधान्य द्यावे. कोरोना काळात नागपूर विभागाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अशाच पद्धतीने विभागात काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या कामाच्या वेळा निश्चित करुन त्या कालमर्यादेत सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

विभागीय आयुक्तालय हे नियंत्रण अधिकाऱ्याच्या भूमिकेत न राहता जिल्हास्तरीय यंत्रणेला पूरक म्हणून काम करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्यासोबतच केवळ जिल्ह्यातून आलेल्या अहवालावर विसंबून न राहता शेवटच्या घटकाकडून मिळणारा प्रतिसाद यावर अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, उपायुक्त चंद्रभान पराते, शैलेंद्र मेश्राम, धनंजय सुटे, अंकुश केदार, रमेश आडे, श्रीमती राजलक्ष्मी शहा, श्रीमती रेश्मा माळी तसेच सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.