शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाच आरोपी अटकेत

By admin | Updated: May 30, 2015 02:57 IST

जुन्या वैमनस्यातून प्रतिस्पर्ध्यावर माऊजरने गोळीबार करणाऱ्या गिजऱ्या लोणारे आणि त्याचे चार साथीदार अजनी पोलिसांच्या हाती लागले आहे.

अजनी गोळीबार प्रकरण: माऊजर-तलवार व चाकू सापडले नागपूर : जुन्या वैमनस्यातून प्रतिस्पर्ध्यावर माऊजरने गोळीबार करणाऱ्या गिजऱ्या लोणारे आणि त्याचे चार साथीदार अजनी पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून माऊजर, तलवार आणि चाकू सापडल्याची माहिती आहे. गिजऱ्याचाच साथीदार गोलू बोरकरने अमोल मेहर आणि त्याच्या साथीदारांनी सुद्धा हल्ला केल्याची तक्रार केली आहे. गुरुवारी रात्री गिजऱ्या गोलू बोरकर, दिनेश धोबी, विक्की रोकडे, गुड्डू निखारे यांनी साथीदारांच्या मदतीने अमोल मेहरच्या घरावर हल्ला केला. माऊजर आणि तलवार घेऊन असलेल्या गुंडांनी हवेत गोळीबार केला. तसेच अमोलला जखमी केले. वस्तीतील वाहनांची तोडफोड केली सूत्रांनुसार गुन्हेगार गोलु बोरकर हा क्रिकेट सट्टेबाज आहे. अमोल मेहर कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच वस्तीत परतला होता. परत आल्यावर त्याचा गोलूसोबत वाद झाला. गोलूवर अमोल भारी पडत होता. तो गोलूला खंडणी मागत होता. गुरुवारी सायंकाळी अमोल आपल्या साथीदारासोबत गोलूच्या घरी गेला. गोलू घरी नव्हता. त्याने त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. ते आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेले. अमोलकडून आपल्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन गोलू, गिजऱ्या व इतर साथीदारासोबत अमोलच्या घरी आला त्याने हवेत गोळीबार करीत अमोलच्या घरावर हल्ला केला. अमोल पळून गेला. अमोल आणि त्याच्या साथीदारांनीही गोळीबार केल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. अजनी पोलीस गुरुवारी रात्रीपासूनच आरोपीच्या शोधात फिरत होते. गोळीबारीची घटना असल्याने गुन्हे शाखा पोलीसही सतर्क झाले होते. शुक्रवारी रात्री गोलूसह इतर पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. (प्रतिनिधी)गँगवारची १० दिवसात दुसरी घटना शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दहा दिवसात गँगवारची ही दुसरी घटना आहे. १९ मे रोजी यावाच्या कुटुंबीयांनी जरीपटका येथील हुडको कॉलनीतील एका व्यक्तीच्या घरावर हल्ला केला होता. वाहनांची तोडफोड केली होती. यानंतर पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना घरी पाठविण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर पुन्हा तशाच प्रकारची गँगवारची घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी पाच काडतूसही सापडले होते. यापैकी एक जिवंत काडतूस होते.