उभ्या गाडीला लागली आग ! नवी दिल्ली - चेन्नई ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’च्या पार्सल डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:45 IST2026-02-17T13:37:59+5:302026-02-17T13:45:54+5:30

Nagpur : नागपूर-सेवाग्राम मार्गावर जिटी एक्सप्रेस थांबली; पार्सल कोचमध्ये भीषण आग

Fire breaks out in parked train! Parcel compartment of New Delhi-Chennai 'Grant Trunk Express' catches fire; Major accident averted | उभ्या गाडीला लागली आग ! नवी दिल्ली - चेन्नई ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’च्या पार्सल डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली

Fire breaks out in parked train! Parcel compartment of New Delhi-Chennai 'Grant Trunk Express' catches fire; Major accident averted

नागपूर : ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’ (नवी दिल्ली–चेन्नई) या गाडीच्या पार्सल डब्याला आज आग लागल्याची घटना घडली. ही घटना नागपूरहून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर, सिंधी (रेल्वे) ते तुळजापूर दरम्यान पोल क्रमांक 784 जवळ उभी असताना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गाडी उभी असताना पार्सल डब्यातून धूर निघताना दिसला. त्यानंतर आग लागल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तात्काळ गाडी थांबवून मदतकार्य सुरू केले.

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ ) चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
 

Web Title : खड़ी ग्रैंड ट्रंक एक्सप्रेस के पार्सल डिब्बे में आग; बड़ा हादसा टला

Web Summary : नागपुर के पास नई दिल्ली-चेन्नई ग्रैंड ट्रंक एक्सप्रेस के पार्सल डिब्बे में आग लग गई। ट्रेन को रोका गया और दमकल कर्मियों ने आग बुझाई। आग लगने के कारणों की जांच की जा रही है। कोई घायल नहीं हुआ, जिससे एक बड़ा हादसा टल गया।

Web Title : Grand Trunk Express Parcel Car Catches Fire; Major Accident Averted

Web Summary : A fire broke out in the parcel car of the New Delhi-Chennai Grand Trunk Express near Nagpur. The train was stopped, and firefighters extinguished the blaze. An investigation is underway to determine the cause. No injuries were reported, averting a major disaster.