शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जान बची लाखो पाये...

By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST

पोलीस ठाण्यातील दुहेरी-तिहेरी कोंडीमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका हवालदाराला आपले दोन दात गमवावे लागले. प्रतापनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका विचित्र अपघाती घटनेने शहरातील

दातावर बेतली, हवालदार गंभीर : प्रतापनगर ठाण्यात अपघातनागपूर : पोलीस ठाण्यातील दुहेरी-तिहेरी कोंडीमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका हवालदाराला आपले दोन दात गमवावे लागले. प्रतापनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका विचित्र अपघाती घटनेने शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील ‘नव्या समस्ये’वर लख्ख प्रकाशझोत टाकला आहे. शहरात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यातील अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी तर सोडा अधिकाऱ्यांनाही बसायला पुरेशी जागा नाही. ज्याच्याकडे तक्रार नोंदवायची, गुन्हे दाखल करायचे, तपासाचा प्रगती अहवाल नोंदवायचा, तेवढ्यांनाच फक्त ठाण्यात बसण्याची सोय. त्यामुळे बाकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले काम (लिखापढीचे) करण्यासाठी बसून असलेले उठण्यापर्यंतची वाट बघावी लागते. त्यामुळे अनेक कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाण्याच्या आवारातच घुटमळताना दिसतात. अशीच अवस्था प्रतापनगर पोलीस ठाण्यातील आहे. येथे कर्मचारी अधिकाऱ्यांचे एकूण संख्याबळ १२० आहे. मात्र, संपूर्ण पोलीस ठाण्यात दाटीवाटीने बसवले तरी ५० पेक्षा जास्त कर्मचारी प्रतापनगर ठाण्यात बसू शकत नाहीत. ठाणेदाराला तर स्वतंत्र कक्ष आहे. मात्र, इतरांना कुठे बसवावे, हा प्रश्न रोजच सतावतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात कसेबसे भागून जाते. पावसाळ्यात येथील कर्मचारी अन् कनिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी कोंडी होते. ठाण्यात चक्क पावसाचे पाणी साचते. तशाही स्थितीत आपापले कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी धडपडत असतात. हवालदार नारायण लक्ष्मणराव इटनकर (वय ५४) अशाच प्रकारे आज दुपारी २ च्या सुमारास आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी धडपडत होते. अचानक पाय घसरून धाडकन् आपटले. तोंडाच्या बळावर पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत त्यांना जवळच्याच खासगी इस्पितळात नेले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्यामुळे इटनकर बचावले. मात्र, त्यांचा वरचा आणि खालचा प्रत्येकी एक (एकूण दोन) दात पडला. आजूबाजूचे दात खिळखिळे झाले अन् ओठांनाही जबर दुखापत झाली. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.माहिती साऱ्यांनाच, उपाययोजना नाही!प्रतापनगर ठाण्यातील अपुरी जागा अन् जमा होणारे पावसाचे पाणी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. त्यामुळे कोंडवाड्यासारख्या जागेत वरिष्ठांचे दडपण आणि कामाचा ताण घेऊन काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची तीव्र कोंडी होत आहे. (प्रतिनिधी)