अखेर पेटचे वेळापत्रक घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST2021-03-27T04:07:32+5:302021-03-27T04:07:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) ...

Finally the stomach schedule announced | अखेर पेटचे वेळापत्रक घोषित

अखेर पेटचे वेळापत्रक घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) नोंदणीसाठी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ‘ऑनलाईन’ अर्ज भरता येणार आहे. २४ एप्रिलपर्यंत ‘पेट’साठी अर्ज भरता येणार असून, १० ते १५ मे या कालावधीत ‘पेट’ घेतली जाणार आहे.

यंदा पेटच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. ‘पेट’च्या दोन टप्प्यामुळे नोंदणी करणाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात होते, मात्र आता विद्यापीठाने ‘पेट-२’ रद्द केली आहे. त्यामुळे आता केवळ एकाच परीक्षेचे आव्हान राहणार आहे. काठिण्यपातळीत वाढ झाल्याने नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या कमी झाली, शिवाय मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. त्यामुळे विधिसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएच.डी.संदर्भात अधिसूचना काढली.

‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅप्टिट्यूड’वर भर

विद्यापीठाने ‘पेट’च्या स्वरूपात बदल केला आहे. ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘जनरल अ‍ॅप्टिट्यूड’वर परीक्षा आधारित असेल, शिवाय ५० प्रश्न हे बहुपर्यायी असतील. मे महिन्यात नव्या नियमावलीनुसार ‘पेट’ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

‘पेट’ वेळापत्रक

अर्ज नोंदणी - १ ते २४ एप्रिल

हार्ड कॉपी पाठविणे - ३० एप्रिलपर्यंत

कागदपत्रांची छाननी - २ ते ५ मे

ऑनलाईन पेट - १० ते १५ मे

निकालाची घोषणा - २२ मे

Web Title: Finally the stomach schedule announced