शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाज नानवानीविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: March 7, 2016 02:37 IST

आधीच विकलेल्या दुकानांचा पुन्हा सौदा करून त्यापोटी ४० लाख रुपये हडपणाऱ्या ठगबाज नानक हरिचंद्र नानवानी ...

४० लाख हडपले : पत्नीही आरोपीनागपूर : आधीच विकलेल्या दुकानांचा पुन्हा सौदा करून त्यापोटी ४० लाख रुपये हडपणाऱ्या ठगबाज नानक हरिचंद्र नानवानी (वय ५२) आणि त्याची पत्नी दिशा नानक नानवानी (वय ४९,रा. अनमोल अपार्टमेंट, जरीपटका) या दोघांविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चावला चौक जरीपटका येथील रहिवासी कन्हैयालाल लेखमल दासवानी आणि नानक नानवानी या दोघांमध्ये व्यावसायिक मैत्री होती. जून २०१५ मध्ये नानवानीने दासवानीला गाठले. कर्जामुळे पैशांची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे आपण कमाल चौकातील आपल्या साईनाथ शॉपिंग कॉम्प्लेक्समधील यूजी २ आणि यूजी ३ ही दोन दुकाने विकायची आहेत, असे सांगितले. मोक्याच्या जागेवर असलेली ही दोन दुकाने फर्निचरसह एक कोटी रुपयात विकत घेण्याचा सौदा दासवानी याने केला. त्याबदल्यात पाच लाखांचे सहा चेक नानकच्या नावे आणि पाच लाखांचे दोन चेक दिशा नानक नानवानी यांच्या नावाने दिले. १० जून २०१५ ते ५ मार्च २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला. आरोपींनी हे ४० लाख रुपये हडपल्यानंतर दुकानांची विक्री करून देण्यासाठी टाळाटाळ चालवली. संशय आल्यामुळे कन्हैयालाल दासवानीने चौकशी केली असता, या दुकानांवर नानवानीने १ कोटी ३८ लाख रुपये उचलल्याचे लक्षात आले. याशिवाय अनेकांना त्याने ही दुकाने विकण्याचा सौदा केल्याचेही उघड झाले. दुकानांची आपण विक्री करून मालकी घेऊ शकत नाही, हे लक्षात आल्यामुळे दासवानीने नानवानीला आपले ४० लाख रुपये परत मागितले. तेव्हा पैसे देण्यास नकार देऊन आरोपीने शिवीगाळ केली, तसेच खोट्या आरोपात फसवण्याचीही धमकी दिली. त्यामुळे दासवानीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आज नानवानी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)हा ‘तोच’ ठगबाज काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने फुटाळा तलावात आत्महत्या करण्याचे नाटक केले होते. उडी घेताच बाहेर काढा, असे त्याने फुटाळयावरील पोहणाऱ्यांना सांगितले होते. हे नाटक केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात आपल्या वकिलांना बोलवून काही व्यापारी त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. पोलिसांसमोर देणेकरी व्यापाऱ्यांची नावे सांगितल्यास ते मनधरणी करतील, असा त्याचा कट होता. तसेच झाले. पोलिसांकडे तक्रार होऊ नये म्हणून काही व्यापाऱ्यांनी आपली रक्कम परत मागणे थांबवले. व्यापाऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक करणारा ‘तो’ हाच ठगबाज होय.