शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 17:50 IST

कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देकुटुंबियामध्येही लक्षणे दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा रुग्ण १८ मार्चपासून नागपुरात आहे. दोन दिवसांपूर्वीपासून लक्षणे आढळून आल्याने बुधवारी मेडिकलमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी नमुने पॉझिटिव्ह आले. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यापूर्वी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांनी मेडिकलमध्ये नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. परंतु आता पुन्हा त्यांचे नमुने तपासले जाणार आहे. व्यवसायाच्यानिमित्ताने ४२ वर्षीय हा पुरुष रुग्ण दिल्लीला गेले होते. १८ मार्च रोजी ते घरी परतले. सुरूवातील काही दिवस प्रकृती ठिक होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदींचा त्रास वाढला. हीच लक्षणे त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांमध्ये होती. यामुळे मंगळवारी त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन नमुन्याची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले. बुधवारी यांनीही आपल्या नमुन्याची तपासणी केली. परंतु आज सकाळी नमुने पॉझिटिव्ह येताच सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे, त्यांनी दिल्ली ते नागपूर हा प्रवास रेल्वेतून केला आहे, आणि गेल्या आठ दिवसांपासून ते नागपुरात आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे. - संपर्कात आलेल्यांनी मेयो, मेडिकलशी संपर्क साधा-लोकमतचे आवाहन कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. आज पॉझिटिव्ह आलेला पाचवा रुग्ण रेल्वेतून प्रवास करून नागपुरात आला आहे. शिवाय, गेल्या आठवड्यापासून नागपुरातच आहे. सुरूवातीचे काही दिवस त्यांनी आपल्या दुकानातही काढल्याची माहिती आहे. या दरम्यान कोणी त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:हून मेडिकल किंवा मेयो रुग्णालयाच्या ‘कोव्हीड-१९’ ओपीडीशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक भावनेतून ‘लोकमत’ने केले आहे

 

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस