शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टीची भरारी

By admin | Updated: June 9, 2015 02:53 IST

दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील तणावात असल्याचे दिसून येते. खेळायला जायचे नाही, टीव्ही

मागासवर्गीयांमधून प्रथम : तणाव न घेता केला अभ्यासनागपूर : दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील तणावात असल्याचे दिसून येते. खेळायला जायचे नाही, टीव्ही पाहायचा नाही, अशी बंधने लावली जातात. अभ्यास करायला वेगळी खोली देण्यात येते व सामाजिक आयुष्यापासून वर्षभर दूरच ठेवण्यात येते. परंतु कर्तृत्व असेल तर यापैकी एकही गोष्ट न करता सहज सर्वांमध्ये राहूनदेखील यश मिळविता येते. कुठलाही तणाव न घेता अगदी मनमोकळेपणे अभ्यास करून सृष्टी वसंत ढोबळे या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे ती मागासवर्गीयांमधून विभागातून प्रथम आली आहे.सोमवारी क्वॉर्टर परिसरात राहणारी सृष्टी ही प्रेरणा कॉन्व्हेंट येथील विद्यार्थिनी आहे. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानादेखील घरच्यांनी तिच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. विज्ञानामध्ये जास्त आवड असणाऱ्या सृष्टीने अगदी बारीकसारीक बाबींचा सखोल अभ्यास केला; सोबतच भाषेसारख्या विषयांकडेदेखील तिने सारखेच लक्ष दिले. याचाच परिणाम म्हणून तिला ९८ टक्के गुण प्राप्त होत असताना संस्कृतसारख्या विषयात चक्क पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले. वर्षभर मी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला. त्यामुळे कधीही तणाव आलाच नाही. अगदी फार वेळवगैरे अभ्यास न करता दर्जावर जास्त भर दिला. अभ्यास करण्यासाठी वेगळी खोलीवगैरे नव्हतीच. एकत्र कुटुंब असल्यामुळे सर्वांमध्ये बसूनच अभ्यास केला. अनेकदा तर टीव्हीवरील कार्यक्रम पाहतदेखील गणित सोडविल्याचे तिने सांगितले. सृष्टीला पुढे जाऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. सृष्टीचे वडील वसंत ढोबळे हे ‘लोकमत’ समूहाचे कर्मचारी असून, आई नीलिमा या गृहिणी आहेत. मुलीच्या या यशामुळे त्यांच्या आनंदाला तर पारावाराच राहिला नव्हता व त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंच्या माध्यमातून भावना व्यक्त होत होत्या. (प्रतिनिधी)