शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद गोडसे यांचे निधन

By admin | Updated: June 4, 2017 01:49 IST

मध्य भारतातील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद दत्तात्रय गोडसे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारतातील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आनंद दत्तात्रय गोडसे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मीना गोडसे, मुलगा गौरव, मुलगी अश्विनी चौबळ आणि मोठा आप्तपरिवार आहे. हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघाली. सायंकाळी ४.३० वाजता मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंद गोडसे हे प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. त्यांनी बडोदा येथून आर्किटेक्टची पदवी संपादन केली. त्यांनी हॉलंड विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा आयसीएचपीबी डिप्लोमा मिळविला होता. यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. भारतातील काहीच लोकांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. ४५ वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक लक्षवेधी इमारती उभ्या केल्या आहेत. यामध्ये कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा समावेश आहे. त्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत आॅटोमोबाईल इमारती, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या इमारती, स्पोटर््स कॉम्प्लेक्स, औद्योगिक इमारतींचे डिझाईन केले आहेत. ते खेळप्रेमी होते. सर्वांना शिक्षण मिळावे, यावर त्यांचा विश्वास होता. सामाजिक उपक्रमांतर्गत गोडसे यांनी स्पोटर््स, खेळ आणि शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात आपली सेवा दिली. यामध्ये हनुमान व्यायाम शाळा प्रसारक मंडळ स्टेडियम व स्विमींग पूल, आणि विदर्भातील अनेक नामांकित एनजीओला सेवा प्रदान केली. त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांना प्राचीन इतिहास व साहित्याची आवड होती.