शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्मिलन दाम्पत्यांना आता कौटुंबिक न्यायालयाचे प्रमाणपत्र

By admin | Updated: August 22, 2016 02:55 IST

घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन समुपदेशनातून पुनर्मिलन होणाऱ्या दाम्पत्यांना कौटुंबिक न्यायालयाने ‘नांदा सौख्य भरे’, ...

नागपूर : घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन समुपदेशनातून पुनर्मिलन होणाऱ्या दाम्पत्यांना कौटुंबिक न्यायालयाने ‘नांदा सौख्य भरे’, असा आशय असलेले प्रमाणपत्र बहाल करणे सुरू केले आहे. विवाह समुपदेशकाच्या माध्यमातून ज्या दाम्पत्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या सकारात्मक निर्णयाचा वैवाहिक बळकटीकरणासाठी फायदा होण्याच्या दृष्टीने या अभिनव उपक्रमास कौटुंबिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय वकील संघ आणि मध्यस्थी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत अग्निहोत्री यांच्या न्यायालयात दाखल प्रकरणात शनिवारी एका दाम्पत्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मानकापूर भागात राहणाऱ्या सुजितने आपली पत्नी स्वप्ना हिच्या विरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या दोघांचे लग्न ९ एप्रिल २०१४ रोजी झाले होते. त्यांना एक मूलही आहे. अचानक पतीने घेतलेल्या निर्णयाने पत्नीला धक्का बसला होता. मुलाचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला होता. अचानक विवाह समुपदेशक या दोघांच्या पुनर्मिलनासाठी धावून आले. त्यांचे मन परिवर्तन करण्यात त्यांना यश आले. आज या दोघांना नांदा सौख्य भरे, असा उपदेश असलेले प्रमाणपत्र कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. एम. बोहरी आणि प्रशांत अग्निहोत्री यांनी बहाल केले.(प्रतिनिधी)