शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नकली नोटा छापणारे मोकाट

By admin | Updated: September 8, 2014 02:18 IST

खुद्द एका पोलीस निरीक्षकाने केलेल्या तपासातील त्रुटींमुळे नकली नोटा छापून चलनात आणणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला ...

नागपूर : खुद्द एका पोलीस निरीक्षकाने केलेल्या तपासातील त्रुटींमुळे नकली नोटा छापून चलनात आणणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविणारे दोन आरोपी मोकाट सुटले. सबळ पुराव्याअभावी या आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एन. टी. घोटेकर यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. प्रवीण सुरेश सिरसाट (२२) रा. आकाशनगर, हुडकेश्वर रोड आणि विक्की ऊर्फ शुभम अशोक शाहू (२३) रा. सेनापतीनगर दिघोरी, अशी आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी की, गुप्त खबऱ्यानुसार अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. पी. दाभाडे यांनी २२ डिसेंबर २०१२ रोजी तुकडोजी चौकातील एसएनडीएलच्या उपकेंद्रानजीकच्या बब्बूभाई पानठेल्यासमोर प्रवीणला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकाच क्रमांकाच्या १०० च्या १५ नोटा जप्त केल्या होत्या. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सावित्रीबाई झोपडपट्टीतील हिरा मेश्राम याच्या घरावर धाड घालून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विक्की शाहू याच्याकडून दोन स्कॅनर प्रिंटर, १०० च्या एकाच क्रमांकाच्या ७ बनावट नोटा, एक खरी नोट, १० च्या एकाच क्रमांकाच्या चार नोटा, एक खरी नोट, कागदावर प्रिंट खराब आलेल्या नोटा, कटर, स्केल, कोरे कागद आदी साहित्य जप्त केले होते. प्रकरण नकली नोटांचे असल्याने पोलीस निरीक्षक बी. पी. साळुंके यांनी तपास स्वत:कडे घेतला होता. त्यांनी जप्त नकली नोटा परीक्षणासाठी नाशिक येथे पाठविल्या होत्या. परंतु साळुंके यांनी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. नकली नोटांच्या संदर्भातील पोलीस स्टेशन डायरीवरील नोंदी आणि लॉगबुक नोंदी न्यायालयात सादर केल्या नव्हत्या. गंभीर त्रुटींची ही बाब बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते. पोलीस तपासातील या त्रुटींचा लाभ आरोपींना मिळून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पराग उके, तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)