शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

दलालांचे प्रशस्त नेटवर्क

By admin | Updated: September 13, 2014 02:43 IST

विविध छाप्यांमध्ये पोलिसांच्या गळाला लागलेल्या दलालांपासून मिळालेली माहिती पोलिसांना चक्रावून टाकणारी आहे.

नरेश डोंगरे नागपूरविविध छाप्यांमध्ये पोलिसांच्या गळाला लागलेल्या दलालांपासून मिळालेली माहिती पोलिसांना चक्रावून टाकणारी आहे. हा गोरखधंदा करणाऱ्या ठिकठिकाणच्या काही मॉडेल्स, ड्रेस डिझायनर, तसेच छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या काही जणींची सचित्र (फोटो अल्बम) यादीच दलालांकडे आहे. सेक्स वर्कर आणि नियमित संपर्कात असलेल्या धनिक ग्राहकांचे मोठे नेटवर्क ही दलाल मंडळी संचालित करते. सेक्स वर्कर-ग्राहक परस्परांच्या थेट कधीच संपर्कात येत नाही. दलालच भेटीचा योग घडवून आणतो. तोच रक्कम ठरवतो. सेक्स वर्करच्या प्रवासाच्या तिकिटांची, येथे फिरण्याची (टॅक्सी) आणि राहण्याची व्यवस्थाही दलालच करतो. ‘आॅन डिमांड’ त्या नागपुरात येतात. काही वेळा ग्राहकाच्या पसंतीनुसार स्थळ बदलते. अर्थात ग्राहक हॉटेलमध्ये जाण्याऐवजी एखाद्या बंगल्याचा किंवा फार्महाऊसचा पत्ता दलालाला देतो. दलालांकडून सुरक्षेची हमी मिळत असल्यामुळे सेक्स वर्कर्स त्याच्यासोबत नेईल त्या ठिकाणी जातात. वर्धमाननगर आणि तहसीलमधील दलाल तर अशावेळी चक्क बाऊंसरही सोबत ठेवतो. पोलिसांचे हात बांधलेले यापैकीच एकीने देहविक्रयासाठी नागपूर हे सेफ डेस्टिनेशन असल्याचेही म्हटले होते. कारण, येथे वेश्याव्यवसाय करताना पकडल्या गेल्यास पोलिसांकडून अटकेची कारवाई होत नाही. ‘दलालाकडून पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, असे सांगून ‘ती’ स्वत:ची सुटका करून घेते. पीडित म्हणून तिला (त्यांना) कायदेशीर संरक्षण असल्यामुळे पोलिसांचे हात बांधले आहेत. त्यामुळे हीच किंवा त्याच तरुणी नंतर दुसरीकडे पुन्हा वेश्याव्यवसायात सक्रिय होतात. उपराजधानीत एकाच तरुणीला अनेकवेळा पोलिसांनी वेश्याव्यवसाय करताना पकडल्याची अनेक उदाहरणे आहेत.(प्रतिनिधी)गंगाजमुनातील वर्दळ कमी देशातील अनेक महानगरात रेडलाईट एरिया आहेत. त्यात नागपूरच्या ‘गंगाजमुना’चाही समावेश आहे. दिशाभूल करून आणलेल्या तरुणी गंगाजमुनातील नरकात ढकलल्या जातात. प्रारंभी त्या येथे मन मारून वेश्याव्यवसाय करतात. नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसायाचा भाग म्हणून त्या येथील नरकयातना सहन करतात. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे ग्राहक येथे जाण्याचे टाळतात. त्याऐवजी ते पॉश कुंटणखान्यावर जातात. तेथे तगडी रक्कम मोजतात. त्यामुळे गंगाजमुनातील वर्दळ कमी होत असल्याची ओरड ‘त्या’ भागातून ऐकू येते. सहा महिन्यात नऊ कारवायागुन्हेशाखेचे सामाजिक सुरक्षा पथक गेल्या काही महिन्यांपासून चांगले सक्रिय झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वातील सामाजिक सुरक्षा पथकाने पॉश कुंटणखान्यांवर धाडी घालण्यासाठी खबऱ्यांचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशपेठ (१२ एप्रिल), यशोधरानगर (२१ मे), कोराडी (१७ जून), लकडगंज (१ जुलै), हुडकेश्वर (७ जुलै), लकडगंज (१८ जुलै), सीताबर्डी (४ आॅगस्ट), एमआयडीसी (२७ आॅगस्ट) आणि धंतोली (९ सप्टेंबर) धाड घातली. येथून पोलिसांनी १६ दलालांना अटक केली.आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या ११ अल्पवयीनांंसह ३५ सेक्स वर्कर्सची सुटका केली.