शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST

मनपातील भाड्याच्या वाहनधारकांची प्रमाणपत्रासाठी धावपळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नियम धाब्यावर बसवून निविदा न काढता महापालिकेतील भाड्याच्या वाहनांना ...

मनपातील भाड्याच्या वाहनधारकांची प्रमाणपत्रासाठी धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नियम धाब्यावर बसवून निविदा न काढता महापालिकेतील भाड्याच्या वाहनांना मुदतवाढ देण्यात आली. परंतु मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यापूर्वी प्रशासनाने संबंधित वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आहे की नाही याची शहानिशा न करता मुदतवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला. मंजुरीनंतर संबंधित वाहनधारक फिटनेस प्रमाणपत्रासाठी धावपळ करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

भाड्याच्या वाहनांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केल्यानंतर मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाने वाहनधारकांना अपडेट कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्र पाठविले. गाडीचा विमा, पियूसी, टॅक्स भरल्याची पावती यासह अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती. म्हणजे कालपर्यंत ही वाहने विनाकागदपत्रे धावत होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनपातील भाजपच्या एका नेत्याच्या दबावात भाड्याच्या वाहनांसाठी नवीन निविदा न काढता जुन्या वाहनांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने स्थायी समितीकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केली होती. त्यानुसार यावर कुणीही आक्षेप न नोंदविता प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

१४ जानेवारी २०१९ रोजी स्थायी समितीने दोन वर्षांसाठी खासगी वाहने भाड्याने घेण्याला मंजुरी दिली. परंतु यात मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. नियमानुसार वाटाघाटी करून सर्वात कमी दराच्या निविदा मंजूर करणे अपेक्षित होते. २२,७०० ते २८ हजार रुपये भाड्याने वाहने घेण्यात आली होती. मर्जीतील लोकांच्या वाहनांना अधिक दर दिला जात असल्याचा आक्षेप आहे.

......

निविदा काढण्याचा विचार बदलला

स्थायी समितीकडे भाड्याच्या वाहनांची निविदा काढण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार होता. मात्र एका नेत्याशी निकटवर्तीयांची ३५ ते ४० वाहने असल्याने या नेत्याच्या दबावात कोविडचे निमित्त पुढे करून नवीन निविदा न काढता जुन्याच वाहनांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीला पाठविल्याची माहिती भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने दिली.