शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट जवाहर विहिरींना मुदतवाढ द्या

By admin | Updated: November 11, 2014 00:59 IST

शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन उपलब्ध व्हावे, या हेतूने २००७ ते २००९ या कालावधीत राज्यात जवाहर विहिरींचा धडक कार्यक्र म राबविण्यात आला. यातील अर्धवट २२४ विहिरींची कामे महात्मा गांधी

नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन उपलब्ध व्हावे, या हेतूने २००७ ते २००९ या कालावधीत राज्यात जवाहर विहिरींचा धडक कार्यक्र म राबविण्यात आला. यातील अर्धवट २२४ विहिरींची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) माध्यमातून पूर्ण करण्याला ३१ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही जिल्ह्यात १५७ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. या विहिरींची कामे पूर्ण करण्याला मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या आशयाचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी सोमवारी दिली. जवाहर विहिरींसाठी शासनाकडून एक लाखाचे अनुदान मिळत होते. परंतु मजुरीचे दर व साहित्याच्या किमती वाढल्याने या रकमेत विहिरीचे खोदकाम शक्य नाही. दुसरीकडे याच कामासाठी मनरेगातून तीन लाखांचे अनुदान दिले जाते. ही बाब विचारात घेता अर्धवट विहिरी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी १.५० लाखांचा निधी शासनाने उपलब्ध करावा, अशी मागणी प्रस्तावातून केली आहे. २००७ ते २००९ या कालावधीत जिल्ह्यातील ३७५३ जवाहर विहिरींना शासनाने मंजुरी दिली होती. यातील १४८० विहिरींची कामे २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात आली तर २२७३ विहिरी अपूर्ण होत्या. यातील ३५० विहिरी २०१२-१३ या वर्षात मनरेगातून पूर्ण करण्यात आल्या. उर्वरित विहिरींची अर्धवट कामे पूर्ण करण्याला जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही १५७ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. या विहिरींच्या कामाला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केल्याची माहिती सावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)