शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा आयातीचा खर्च उघड करा

By admin | Updated: February 12, 2015 02:29 IST

कोळसा आयातीत मंत्री व अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या ....

नागपूर : कोळसा आयातीत मंत्री व अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कोळसा आयातीचा खर्च उघड करण्याचे आदेश महाजनकोला दिलेत. तसेच, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली. देशातील कोळसा कंपन्या मागणी पूर्ण करीत नसल्याचे कारण सांगून महाजनको आॅस्ट्रेलिया व इंडोनेशियातून चढ्या दराने कोळसा आयात करते. दुसऱ्या देशातून महाजनकोच्या प्रकल्पापर्यंत कोळसा आणण्याच्या प्रक्रियेत मूळ किमतीत १०० टक्के वृद्धी होते. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला जातो. गैरव्यवहार करण्याची संधी मिळते म्हणूनच कोळसा आयातीचा आग्रह धरला जातो असा आरोप याप्रकरणाशी संबंधित याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी सुनावणीदरम्यान केला. महाजनकोने आरोप फेटाळून लावले. सर्वांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने महाजनकोला कोळसा आयातीच्या खर्चाची माहिती मागितली. महाजनकोनुसार केंद्रीय वीज प्राधिकरण व ऊर्जा मंत्रालय यांच्या निर्देशान्वये कोळसा आयातीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक कंपन्या कोळशाची मागणी पूर्ण करीत नाही. यामुळे वीज उत्पादन घटते व मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागते. परिणामी २०१२-१३ मध्ये २.४७९ तर, २०१३-१४ मध्ये २.५४६ मिलियन मॅट्रिक टन कोळसा आयात करण्यात आला आहे. वेकोलिद्वारे महाजनकोला केला जात असलेला दर्जाहीन कोळशाचा पुरवठा, महाजनकोकडून केली जात असलेली कोळशाची आयात, दर्जाहीन कोळशामुळे वीज प्रकल्प व वीज निर्मितीवर होणारा वाईट परिणाम इत्यादी गंभीर बाबींकडे लक्ष वेधणाऱ्या तीन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात अनिल वडपल्लीवार, श्रीकांत ढोलके व मृणाल घाटे यांच्या याचिकांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)