खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक

By Admin | Updated: May 9, 2014 02:27 IST2014-05-09T02:27:46+5:302014-05-09T02:27:46+5:30

बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन असे तीन व्यवसाय निवडण्यात आले.

Expert appointment at private level | खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक

खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक

बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न
नागपूर: बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन असे तीन व्यवसाय निवडण्यात आले. या व्यवसायात ज्या बेरोजगारांमध्ये थोडेफार कौशल्य असेल त्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले.
सर्वात अगोदर १४८३ बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करून त्यांचे कौन्सिलिंग करण्यात आले. त्यापैकी १२८२ उमेदवारांची टेस्ट घेण्यात आली. ९१४ उमेदवारांची प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यापैकी ४२४ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यातून ३७२ बेरोजगारांना नोकरी उपलब्ध झाली. हा एक छोटेखानी प्रयत्न गडचिरोलीत यशस्वीपणे राबविण्यात आला. राज्य शासनानेसुद्धा याची गंभीरतेने दखल घेतली आहे.
'गडचिरोली पॅटर्न'च्या धर्तीवर हा प्रकल्प आता संपूर्ण राज्यात लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या माध्यमातून नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सांगली आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यासंबंधात लवकरच शासनातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

असा असेल 'कौशल्य विकास कार्यक्रम'
■ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्यांचे कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष खासगी आस्थापनाद्वारे त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे. गावपातळीवर जाऊन बेरोजगार तरुणांशी संपर्क साधणे, त्यांच्यातील व्यवसायाच्या दृष्टीने असलेल्या कौशल्याची माहिती करून घेणे. ते कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, याबाबत कौन्सिलिंग करणे, प्रशिक्षणाद्वारे त्याला नोकरीसाठी सक्षम करणे.
 

Web Title: Expert appointment at private level