शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उमरेडच्या कोविड सेंटरला मिळाली जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

उमरेड : दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अनेकांच्या चिंतेत भर पडत आहे. अशातच दुसरीकडे उमरेड येथे कोविड सेंटरच नसल्याने ...

उमरेड : दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अनेकांच्या चिंतेत भर पडत आहे. अशातच दुसरीकडे उमरेड येथे कोविड सेंटरच नसल्याने बिकट समस्या निर्माण झाली होती. तालुक्यातील रुग्णांना भिवापूरच्या कोविड सेंटरमध्ये पाठविले जात होते. रुग्णांना होणारा त्रास आणि समस्या याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेरीस तालुका व्यवस्थापन समितीला कोविड सेंटरसाठी जागा मिळाली. उमरेड पालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात ही सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती उमरेड पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी दिली. ‘लोकमत’ने ४ मार्च रोजीच्या अंकात ‘गंभीरच! उमरेडमध्ये कोविड सेंटरच नाही’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करीत या समस्येकडे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल आमदार राजू पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया यांनी घेत यावर विचारविमर्श करीत निर्णय घेतला. अखेरीस स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे कोविड सेंटर निश्चित करण्यात आले. येत्या काही दिवसात उपरोक्त सांस्कृतिक भवनात लवकरच कोविड सेंटर सुरू होणार आहे. यामुळे उमरेड तालुक्यातील रुग्णांना भिवापूरचा उलट प्रवास आणि त्रास टाळता येणार आहे. मागील काही वर्षांपासून धूळ खात पडलेल्या या सांस्कृतिक भवनाची युद्धस्तरावर स्वच्छता केली जात आहे. वीज, पाणी आणि अन्य सुविधांकडेही लक्ष दिले जात आहे. शिवाय अवतीभवतीचाही परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी व्यक्त होत आहे.