शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:02 IST

सध्या ठेवीवरील व्याजदर २.९० टक्के ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ५.१० टक्के यादरम्यान आहेत.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : गेल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात केल्याने सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत, परंतु कर्जाला उठावनाही, अशी माहिती नागपुरातील अनेक बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली.

स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक आदी बँकांनी आपले व्याजदर कमी केले आहेत. अनेक बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे रेपो-लिंक्ड-रेट (आरएलआर) ही पद्धती स्वीकारली आहे. त्यामुळे रेपो रेट कमी/जास्त झाल्यास व्याजाचा दर आपोआप कमी अथवा जास्त होतो.

सध्या ठेवीवरील व्याजदर २.९० टक्के ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ५.१० टक्के यादरम्यान आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यावर ०.५० टक्के अधिक व्याज मिळते, परंतु हे दर फारच कमी असल्याने खासगी क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. हरिभाऊ नागमोते एसटीमधून सेवानिवृत्त झाले. माझे बँक ठेवीवरील मासिक व्याज १४ हजारांवरून १३ हजारांवर आले आहे. पेन्शन नसल्याने हा माझ्यासाठी मोठा आघात आहे, असे नागमोते म्हणाले.

ठेवींवरील व्याज कमी झाल्याने बँकांनी कर्जावरील व्याजाचे दरही कमी केले आहेत. सध्या बहुतेक बँकांचा गृहकर्जाचा दर ७.२५ ते १०.२५ टक्क्यांदरम्यान आहे, तर व्यक्तिगत कर्जाचा दरही १० ते १२ टक्के झाला आहे.पण सध्या कोविड-१९ च्या लॉकडाउनमुळे बहुतेक नागरिकांची प्राथमिकता व्यक्तिगत सुरक्षेकडे आहे. परिणामी व्यक्तिगत कर्ज, वाहन कर्ज अथवा गृहकर्जाला मागणीच नाही, अशी माहिती बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी दिली.

विनातारण कर्जाला मागणी कमी

कोविड-१९ साठी केंद्र सरकारने जे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, त्यात ३ लाख कोटी लघु व मध्यम उद्योगांना विनातारण कर्जासाठी ठेवले आहेत. सध्या थकीत असलेल्या खेळत्या भांडवल कर्जाच्या २० टक्के अतिरिक्त कर्ज चार वर्षांत परतफेडीच्या कराराने उद्योजकांना मिळणार आहे. पण त्यालाही फारसा उठाव नाही, अशी माहिती बँक अधिकाºयांनी दिली. या पार्श्वभूमीवर सध्या गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना ३ लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज देण्याची अनोखी योजना बँक आॅफ महाराष्ट्रने आणली आहे, अशी माहिती झोनल मॅनेजर मनोज करे यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या