शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या नावावर प्रतिष्ठानच बंद करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीत कार्यालयातील १३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीत कार्यालयातील १३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात एक महिला शिपाईसुद्धा आहे. यातील १२ कर्मचारी हे कंत्राटी आहेत. यावरून या प्रकरणातील मोठे मासे वाचवण्यासाठीच ही कारवाई तर झाली नाही ना? अशी शंका निर्माण होते. त्यामुळे सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच चौकशीच्या नावावर प्रतिष्ठानच बंद करू नये, अशी मागणी पुढे आली आहे.

रिपब्लिकन आघाडीचे निमंत्रक संजय पाटील यांनी यासंदर्भातील निवेदनही सरकारला सादर केले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, प्रतिष्ठानातील आर्थिक गैरव्यवहाराची अनेकदा तक्रार केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. चौकशीच्या नावावर १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. ती चुकीची आहे. कारण या कर्मचाऱ्यांकडे देवाण-घेवाणीचे कुठलेही अधिकार नव्हते. ते केवळ आलेल्या आदेशांचे पालन करणारे आणि कार्यक्रम राबविण्यापुरतेच मर्यादित होते. खरे दोषी प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ आहे. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने सध्या या कार्यालयात एकही कर्मचारी नाही. त्यामुळे चौकशीच्या नावावर प्रतिष्ठानचे कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न होऊ नये. नागपुरात मुख्यालय असलेले ते कार्यालय आहे. यात नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ते सुरू करावे, प्रतिष्ठान ज्या उद्देशाने सुरू झाले तो उद्देश राज्य सरकारने प्रामाणिकपणे राबवावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

बार्टीचे कार्यालय नागपुरात यावे

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत असलेले बार्टीचे मुख्यालय पुण्यात आले. समाजकल्याण आयुक्तालयसुद्धा पुण्यात आहे. या दोनपैकी एकतरी कार्यालय नागपुरात असणे आवश्यक आहे. बार्टीचे मुख्यालय नागपुरात आले तर या विभागात मोठा फरक पडल्याचे दिसून येईल, असे संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही सरकारकडे अनेकदा मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.