शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ईपीएफओची वेबसाइट जाम; कर्मचारी त्रस्त, अकाऊंट अपडेशन रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:48 IST

प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन खात्यात जमा करण्याचा नियम भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. या प्रक्रियेत एक-दोन दिवस उशीर झाल्यास १४बी व ७क्यू अंतर्गत इंटरेस्ट डॅमेज वसूल केला जातो.

नागपूर : ईपीएफओच्या कार्यप्रणालीला आधीच कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आता पीएफ वेबसाइट जाम होत असल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. पीएफ कर्मचारी वेबसाइट ओपन करताना निर्माण होत असलेल्या अडचणींमुळे त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, सर्व कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, वेबसाइट संचलनाची गती अत्यंत मंद झाल्याने आणि त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करणे अवघड होत आहे. पीएफ खात्यामधील जमा होत असलेला एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन निधी ई-पास बुकमध्ये तत्काळ अपडेट होत नसल्याची तक्रार सर्वच कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत असलेल्या मेसेजेसमध्ये ही बाब स्पष्ट होत आहे. 

व्याज देण्यास उशीरप्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन खात्यात जमा करण्याचा नियम भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. या प्रक्रियेत एक-दोन दिवस उशीर झाल्यास १४बी व ७क्यू अंतर्गत इंटरेस्ट डॅमेज वसूल केला जातो. मात्र, कर्मचाऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत व्याज जमा करण्यास सातत्याने उशीर होताना दिसत आहे. दरवर्षी यात उशीर होत असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षात ८ ते १० महिन्यांचे व्याज जमा करण्यात आले आहे. अशा स्थितीत कंपन्यांसाठी लागू केलेला नियम ईपीएफने स्वत:साठी लागू करणे गरजेचे आहे. 

रिटर्न्स फाईल कसे करणार?२.५ लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या व्याजावर टॅक्स लागेल, असा नियम आणण्यात आला आहे. परंतु, वेळेवर व्याज जमा होत नसल्याने, नागरिकांकडून रिटर्न्स फाईल कसे केले जातील, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...या समस्या कधी संपणार?- पीएफची वेबसाईट उघडण्यास अडचणी येत आहेत.- कॉन्ट्रिब्युशन जमा झाल्यावरही ई-पासबुक अपडेट केले जात नाही. - मंद गती असल्याने ई-नॉमिनेशनमध्ये अडचणी.- पीएफवर मिळणारे व्याज जमा करण्यात उशीर. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारी