शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

जिचकार कुटुंबाचे अतिक्रमण

By admin | Updated: June 13, 2014 01:28 IST

बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी

बोखारा नाल्यावरील अतिक्रमण : प्रशासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
नागपूर : बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब पुढे आली आहे. सर्व्हे क्र. १०३-२ ही १.०६ हेक्टर जागा मैत्रेयी व याज्ञवल्क्यच्या नावाने आहे.
८० फूट रुंदीचा भोकारा नाला अतिक्रमणामुळे १० फुटांचा झाला आहे. न्यायालयाने गेल्या तारखेला या प्रकरणाची चौकशी करून ११ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोटघरे यांनी शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर केले. भूमी अभिलेख (ग्रामीण) विभागाचे उपअधीक्षक, नायब तहसीलदार (ग्रामीण), महसूल निरीक्षक आदी अधिकाऱ्यांनी ६ जून रोजी भोकारा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी केली. त्यांना भोकारा नाल्याच्या ०.३७ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आढळून आले आहे. अतिक्रमित भागात मैत्रेयी व याज्ञवाल्क्यसह संतकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, ताजकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, हिंद हॉटेल आदींच्या नावानेही जमीन असल्याची माहिती मोटघरे यांच्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शासकीय अधिकारी व भूमाफिया यांनी मौजा बोखारा येथील नाला बुजवून, त्यावर ले-आऊट पाडून भूखंड विकले आहेत. २००४ मध्ये आमदार शोभा फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोखारा नाल्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला होता. १७ जून २०१३ रोजी नायब तहसीलदारांनी गोधनी रेल्वेचे मंडळ अधिकारी व बोखाराचे तलाठी यांना नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस उपायुक्त, ग्रामसेवक व ग्रामपंचायतला पत्र लिहिले होते. परंतु गेल्या १० वर्षांत काहीच झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी याचिकाकर्त्यातर्फे तर मध्यस्थ अ‍ॅड. सतीश उके यांनी स्वत: बाजू मांडली.(प्रतिनिधी)