गांधीसागर तलावाला अतिक्रमणाचा विळखा

By Admin | Updated: July 3, 2014 00:54 IST2014-07-03T00:54:45+5:302014-07-03T00:54:45+5:30

गांधीसागर तलाव हा अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलावाच्या चारही बाजूंचे अतिक्रमण काढण्यात यावे, विशेषत: झुलेलाल ट्रस्टद्वारा करण्यात आलेले अतिक्रमण काढा, अशी मागणी गांधीसागर

Encroachment of encroachment in Gandhasagar lake | गांधीसागर तलावाला अतिक्रमणाचा विळखा

गांधीसागर तलावाला अतिक्रमणाचा विळखा

मनपा आयुक्तांशी चर्चा : गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेची मागणी
नागपूर : गांधीसागर तलाव हा अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलावाच्या चारही बाजूंचे अतिक्रमण काढण्यात यावे, विशेषत: झुलेलाल ट्रस्टद्वारा करण्यात आलेले अतिक्रमण काढा, अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने केली आहे. गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांच्या नेतृत्वात बुधवारी मनपा आयुक्त श्याम वर्धने यांची भेट घेऊन यासंबंधात चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, झुलेलाल ट्रस्टद्वारा कुठलीही लीज नसताना गांधीसागर तलाव परिसरात अतिक्रमण करून अवैध बांधकाम करीत आहे. ट्रस्टने जलपूजा आणि प्याऊ केंद्राकरिता मागणी केली होती. या माध्यमातून उद्यानात बऱ्याच मोठा जागेवर त्यांचा कब्जा आहे. त्याद्वारे कमर्शियल विवाह समारंभ, बर्ड डे पार्टी आदी कार्यक्रम करून उत्पन्न कमवीत आहे. तलावाच्या आड येणारे बांधकाम केले जात आहे. याच माध्यमातून ब्रेड विक्रीचा व्यवसायसुद्धा केला जातो. तलावातील मासोळ्यांना ब्रेड घाऊ घातल्याने अनेक मासोळ्या मरण पावल्या आहेत. आयुक्त वर्धने यांनी गांधीसागरचे प्रोजेक्ट आॅफिसर इसराईल, धंतोली झोनचे सहायक आयुक्त जयदेव आणि अभियंता जांभुळकर यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच गैरकायदेशीर बांधकाम त्वरित तोडण्याचे आदेश दिले, तसेच चारही बाजुंचे अतिक्रमण काढा असेही निर्देश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment of encroachment in Gandhasagar lake