शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; प्रवेश परीक्षेसाठी ‘व्हर्च्युअल क्लासेस’वर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 11:47 IST

प्रवेश परीक्षा काही आठवड्यातच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा स्थितीत ‘कोचिंग क्लासेस’कडून ‘व्हर्च्युअल क्लास’वर जास्त भर देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’मध्ये विद्यार्थी अभ्यासात व्यस्त ‘नोट्स’ थेट ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून

सय्यद मोबीननागपूर : उपराजधानीत ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे सर्व ‘कोचिंग क्लासेस’ बंद आहेत. प्रवेश परीक्षा काही आठवड्यातच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा स्थितीत ‘कोचिंग क्लासेस’कडून ‘व्हर्च्युअल क्लास’वर जास्त भर देण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करुन घेण्यात येत आहे.राज्य पातळीवरील अभियांत्रिकी, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी ‘एमएचसीईटी’, राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकीमध्ये प्रवेशासाठी ‘जेईई’, वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ देणे अनिवार्य आहे. ‘व्हर्च्युअल क्लासेस’च्या माध्यमातून यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.‘ऑडिओ-व्हिडीओ’च्या माध्यमातून धडेशिक्षकांकडून संबंधित विषयांची ‘ऑडिओ’ व ‘व्हिडीओ क्लीप’काढून ती विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे. त्यातूनच विद्यार्थी अभ्यास करत आहेत. जर काही समस्या असतील तर ते फोन किंवा ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून शिक्षकांशी संपर्क करत आहेत.परीक्षेची मुदत वाढण्याची अपेक्षाप्रवेश परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात येण्याची ‘कोचिंग क्लासेस’च्या संचालकांना अपेक्षा आहे. देशभरात ‘लॉकडाऊन’ असल्याने प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्याच लागणार आहेत. सध्याची जी स्थिती आहे त्याचा सामना सर्वांना मिळूनच करायचा आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात नुकसान होऊ नये याचीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने शिकविण्यात येत असल्याचे ‘कोचिंग क्लास’ संचालक मुस्तफा खान यांनी सांगितले.‘मोबाईल अ‍ॅप’मुळे फायदाकाही ‘क्लासेस’ने ‘मोबाईल अ‍ॅप’ तयार केले आहेत. याचा फायदा विद्यार्थी व शिक्षकांना होत आहे. याचा उपयोग केवळ ‘क्लासेस’चे विद्यार्थीच करु शकत आहेत. ‘स्मार्ट फोन’च्या माध्यमातून ‘नोट्स’ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस