जीव देण्याची धमकी देत ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ अन् अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

By योगेश पांडे | Published: October 12, 2023 03:00 PM2023-10-12T15:00:52+5:302023-10-12T15:02:23+5:30

‘इन्स्टाग्राम फ्रेंड’ने केला विश्वासघात : व्हिडीओ व्हायरल करण्याचीदेखील दिली धमकी

'Emotional blackmailing' and torture of a minor student by threatening her | जीव देण्याची धमकी देत ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ अन् अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

जीव देण्याची धमकी देत ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ अन् अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

नागपूर : इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका आरोपीने स्वत:चा जीव देण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीचे ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत आरोपीची मजल गेली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नंदू श्रीधर डोहाले (२१, लोखंडेनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली व ते नियमित बोलू लागले. त्याने तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मुलगीदेखील त्याच्या जाळ्यात फसत गेली. त्याला तिच्याशी शारीरिक संबंध जोडायचे होते. मात्र ती विरोध करत होती.

त्याने स्वत:चा जीव देण्याची धमकी देत तिला एका ठिकाणी बोलविले. तेथून त्याने तिला दुचाकीवर बसवले व मित्राच्या खोलीवर नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार असा प्रकार सुरू केला. त्याने तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला. तसेच तिला मारहाणदेखील केली. १ सप्टेंबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा प्रकार चालला. अखेर या प्रकाराला कंटाळलेल्या विद्यार्थिनीने घरच्यांना माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात नंदूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नंदूला अटक केली आहे.

Web Title: 'Emotional blackmailing' and torture of a minor student by threatening her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.