शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वीज ग्राहकांना आता मिळणार ‘थर्मल पावती’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 22:01 IST

महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज ग्राहकांनी केलेला वीजबिलाचा भरणा अचूक व त्यांच्या खात्यावर वेळेत समायोजित व्हावा यासाठी महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून नागपूर शहरातील काँग्रेसनगर, महाल, बुटीबोरी, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या पाच विभागातील वीज ग्राहकांना बुधवारपासून या पद्धतीच्या पावत्या वितरित करण्यास सुरुवात झाली.नागपूर शहरातील वरील पाच विभागासह राज्यातील आणखी २५ शहरी विभागांमध्ये या पद्धतीच्या पावत्या १६ सप्टेंबरपासून वितरित करण्यात येत आहेत. नागपूर शहरातील वीज ग्राहकांनी अशा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खात्री करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.कल्याण आणि भांडुप परिमंडळातील ठाणे, वाशी, कल्याण-१ व २, वसई या मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रातून छापील कागदाऐवजी थर्मल पेपरवर संगणकीकृत क्रमांकासह पावत्या छापून देण्यास १ एप्रिल २०१९ पासून सुरुवात करण्यात आली होती.आता नागपूर शहरासह नाशिक , मालेगाव, औरंगाबाद , भुसावळ, जळगाव शहर, नांदेड, अकोला शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर, सांगली शहर, भोसरी, कोथरूड, पिंपरी, पुण्यातील शिवाजीनगर, बंडगार्डन, नगर, पर्वती, पद्मावती, रास्तापेठ या २५ विभागांमध्ये वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना संगणकीकृत क्रमांक असणाऱ्या पावत्या थर्मल पेपरवर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्रमांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅप वीजबिल भरल्याची खात्री करता येईल. त्यामुळे ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खातरजमा करावी व संगणकीकृत पावतीशिवाय वीजबिल भरू नये. तसेच फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात व यासंदर्भात नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल