शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शन फिव्हर; उमेदवारी आपल्याच भाऊला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:52 IST

तिकीटवाटपाच्या अगोदर दावेदारांच्या समर्थकांकडून वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असल्याचे दावे करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे‘सोशल मीडिया’वर समर्थकांचा दावा इच्छुकांकडून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप निश्चित झालेला नाही. शहरातील सहाही जागांसाठी भाजपचे नेते आग्रही आहेत. परंतु यातील चार जागांवर दोन किंवा त्याहून अधिक दावेदार आहेत. तिकीटवाटपाच्या अगोदर दावेदारांच्या समर्थकांकडून वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असल्याचे दावे करण्यात येत आहे.भाजपतर्फे अद्याप तिकीटवाटपाचे धोरण निश्चित झालेले नाही. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी विधानसभेसाठी ‘बायोडाटा’ देऊन चमकोगिरी करणाऱ्यांना नव्हे तर उमेदवाराच्या कामगिरीवरच तिकीट देण्यात येईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. भाजपतर्फे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्या आधारावरच काही जणांचे तिकीट निश्चित होणार असल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे.अशा स्थितीत ज्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. शिवाय काही संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे. मागील महिन्यात कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदेखील पार पडल्या. यात दक्षिण पश्चिम नागपूर व पूर्व नागपूर वगळता इतर चारही मतदारसंघातील इच्छुकांची गर्दी झाली होती.मात्र मुलाखती होऊन तीन आठवडे झाल्यावरदेखील नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, इच्छुकांच्या समर्थकांकडून ‘सोशल मीडिया’वर प्रचारालाच सुरुवात झाल्याप्रमाणे ‘पोस्ट’ टाकण्यात येत आहे. आपलाच नेता हा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा उमेदवार असेल अशा आशयाच्या या ‘पोस्ट’ आहेत. विशेष म्हणजे ‘फेसबुक’वरील अशा ‘पोस्ट’मध्ये तर इच्छुक उमेदवारांनादेखील ‘टॅग’ करण्यात येत आहेत.काही समर्थकांनी उमेदवारांच्या नावाने ‘पेजेस’च तयार केले आहेत. यावर त्यांच्या दररोजच्या कार्यक्रमांची, दौºयाची अगदी प्रचार सुरू असल्याप्रमाणे इत्थंभूत माहिती टाकण्यात येत आहे. आता नेमका कुणाचा दावा खरा व कुणाचा ‘भाऊ’ उमेदवार म्हणून समोर येतो हे पितृपक्ष संपल्यावरच स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक