आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST2021-03-27T04:07:38+5:302021-03-27T04:07:38+5:30

नराधम गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नातेसंबंधातील एका आठ वर्षीय बालिकेचा दोन महिन्यांपासून लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला अजनी ...

Eight-year-old girl tortured | आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार

नराधम गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नातेसंबंधातील एका आठ वर्षीय बालिकेचा दोन महिन्यांपासून लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र प्रेमदास शेळके (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित बालिकेची आई रूग्णालयात काम करते. ती कामानिमित्ताने बाहेर गेल्यावर हा नराधम बालिकेचे शोषण करायचा. दिनांक २८ जानेवारी ते १४ मार्चपर्यंत त्याचे हे कुकृत्य सुरू होते. हे लक्षात आल्यानंतर या नराधमाला नातेवाईकांनी फटकारले. त्यामुळे काही दिवस शांत राहिला. अलिकडे पुन्हा त्याची विकृती जागी झाली. त्यामुळे पीडित बालिका प्रचंड दहशतीखाली होती. तिच्या आईने गुरुवारी अजनी पोलीस ठाण्यात येत याविषयीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी महेंद्र शेळकेला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

---

Web Title: Eight-year-old girl tortured