शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पैसे कमविण्याचा मार्ग ठरत आहे ‘एग डोनेशन’

By admin | Updated: February 20, 2016 03:33 IST

स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ते शक्य झाले आहे.

सरोगसीपेक्षा सोपे तंत्रज्ञान :महिलांकडून इस्पितळांमध्ये होत आहे विचारणानागपूर : स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ते शक्य झाले आहे. ‘स्पर्म डोनर’सोबतच आता ‘एग डोनर’च्या माध्यमातून गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरत आहे. विशेष म्हणजे, सरोगसीपेक्षा सोपा आणि लवकर पैसे मिळवण्याचा हा मार्ग म्हणून याकडे पाहिले जात असल्याने नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील महिला ‘एग डोनेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे.बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे वंधत्वाचे (इन्फर्टिलिटी) प्रमाण वाढत चालले आहे. भारतामध्ये १८ ते ३५ वयोगटातील १० टक्के दाम्पत्यामध्ये वंध्यत्व आढळते. ताणतणाव, लठ्ठपणा, शहरी जीवनपद्धती, व्यसनाधिनता, व्यावसायिक बंधने यामुळे वंध्यत्व दिसते. मुले होत नाहीत, म्हणून बऱ्याचदा स्त्रीला दोषी ठरवले जाते. पण योग्य समुदपदेशन व तंत्रज्ञानामुळे याचा फायदा दाम्पत्याला होत असल्याचे दिसून येत आहे. यात ‘एग डोनर’ची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. या प्रक्रि येला किमान पंधरा दिवस लागतात. रोज एक इंजेक्शन दिले जाते. त्यासाठी प्रति दिवस ठरलेली रक्कम देऊ केली जाते, सरोगसीपेक्षा हा सोपा मार्ग असल्याने अनेक महिलांकडून संबंधित इस्पितळांमध्ये विचारणा होत आहे. (प्रतिनिधी)काय आहे ‘एग डोनेशन प्रोग्राम’स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी सांगितले, स्त्रीबीज दान करणाऱ्या महिलेला संपूर्ण ‘एग डोनेशन प्रोग्राम’ची माहिती दिली जाते. पहिल्या टप्प्यात तिची रक्ताची चाचणी आणि सोनोग्राफी केली जाते. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट करून तिला कोणताही आजार नसल्याची खात्री करवून घेतली जाते. या प्रकियेत मासिकपाळी येण्यापूर्वी स्त्रीबीजाची संख्या वाढविणारे हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात. त्यानंतर पुढील महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी स्त्री बीज काढून टाकण्यात येते. याला किमान पंधरा दिवस लागतात.स्त्री-बीज देणे गुन्हा नाहीनियमानुसार स्त्री-बीज देणे हा गुन्हा नाही. मात्र, ते कुणी द्यायला हवे याचे काही नियम आहेत. वर्षातून कमीत कमी तीन वेळा स्त्री-बीज देता येते. २१ ते ३५ वयोगटातील स्त्री, विवाहित महिला स्त्रीबीज दान करू शकते. तिला स्वत:चं एक मूल असणं गरजेचं आहे. ती शिकलेली असावी , तिचा रंग आणि चेहरा चांगला असावा , उच्चार स्पष्ट असावेत आणि व्यंग नसलेली कोणतीही स्त्री ‘एग डोनेट’ करू शकते.