शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’वर प्रभावी उपचार

By admin | Updated: January 11, 2017 02:42 IST

देशात डोक आणि मानेच्या (हेड अ‍ॅण्ड नेक) कॅन्सरचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यातल्या त्यात तोंडाचा कॅन्सरचे प्रमाण ३३ टक्के आहे.

१६ मेडिकलला दिले जाणार विशेष प्रशिक्षण : टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या निवृत्त डॉक्टरांचा पुढाकार सुमेध वाघमारे   नागपूर देशात डोक आणि मानेच्या (हेड अ‍ॅण्ड नेक) कॅन्सरचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यातल्या त्यात तोंडाचा कॅन्सरचे प्रमाण ३३ टक्के आहे. महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण ३१.४ आहे. यामुळे या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण राज्यात आढळून येतात. शासनाने याला गंभीरतेने घेत राज्यातील १६ मेडिकल रुग्णालयांमध्ये ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’च्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहे. यासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे निवृत्त कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलतान प्रधान यांनी पुढाकार घेतला आहे. या हॉस्पिटलच्या निवृत्त विशेषज्ञाची एक चमू प्रत्येक मेडिकल रुग्णालयाच्या डॉक्टरांना या विषयी प्रशिक्षण देणार आहे. याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातून होत आहे. भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. या आजाराने हृदयाघात व मधुमेहास ही मागे टाकले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा असून उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्यभारताचा विचार केल्यास विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. यात पुरुषांमध्ये आढळून येणारा ५० टक्के कॅन्सर तर महिलांमध्ये आढळून येणारा २० टक्के कॅन्सर हा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरांमुळे होतो.