शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १७ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा

By admin | Updated: June 30, 2014 00:48 IST

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात चालू वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चाललेल्या एकूण १४४ प्रकरणांच्या खटल्यात केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण १७ तर

न्यायालय : पाच महिन्याचा लेखाजोखाराहुल अवसरे - नागपूरनागपूर जिल्हा सत्र न्यायालयात चालू वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चाललेल्या एकूण १४४ प्रकरणांच्या खटल्यात केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण १७ तर निर्दोष सुटण्याचे प्रमाण ८३ टक्के आहे. ही प्रकरणे भारतीय दंड विधान आणि विशेष कायद्यांतर्गतची आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुनाचे एकूण ३५ खटले चालले. त्यापैकी २५ प्रकरणातील आरोपी सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटले तर १० प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली, ३ आरोपींना दोन ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा झाली. जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. खुनातील शिक्षेचे प्रमाण २८.५७ टक्के आहे. बलात्काराचे एकूण १३ खटले चालून केवळ ३ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का), अमली पदार्थविरोधी कायदा, वीज कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतची प्रकरणे विशेष न्यायालयांमध्ये चालतात. त्यापैकी अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गतच्या केवळ एका प्रकरणात शिक्षा झालेली असून ११ प्रकरणे निर्दोष सुटलेली आहेत. वीज कायद्यांतर्गतची सर्व तेराही प्रकरणे निर्दोष सुटलेली आहेत. मोक्का, लाचलुचपत प्रतिबंधक आणि जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.