शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या हाती नको

By admin | Updated: August 22, 2016 02:44 IST

आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे.

मुकुल कानिटकर : सामाजिक मुद्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत वैचारिक मंथननागपूर : आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे. देशातील शिक्षणप्रणालीचा कायापालट करायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबाबतच्या विचारांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच शिक्षणाची दुरावस्था दूर होईल, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘शिक्षणतज्ज्ञ बाबासाहेब’ या विषयावर बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भारतामातेवर निष्ठा होती. ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे भारताला जगासमोर मांडले. शिक्षण हे समाजप्रबोधनाचे साधन आहे हे बाबासाहेबांचे ठाम मत होते. व्यक्तीला स्वावलंबी बनविणारे, नैतिक मूल्य वाढविणारे व स्वायत्त व्यवस्था असलेले शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता. परंतु बाबासाहेबांचे विचार शिक्षणव्यवस्थेत अंगिकारण्यात आले नाहीत, हे दुर्दैव आहे. कारण तसे झाले असते तर प्रत्येक अभ्यासक्रमातून समाजप्रबोधन झाले असते व अशा स्थितीत अशी परिषद घ्यावीच लागली नसती, असे कानिटकर म्हणाले. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)संविधान हीच देशाची संस्कृती : वेदप्रकाश मिश्रापरिसंवादादरम्यान डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘संस्कृतीचे संविधान की संविधानाची संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ही आहे. संविधानाच्या प्रास्ताविकाच्या सुरुवातीला ‘आम्ही’ असा शब्द वापरण्यामागे बाबासाहेबांचा सखोल विचार होता. आपल्या देशातील सर्वात पवित्र ग्रंथ हा संविधानच आहे व खऱ्या अर्थाने संविधान हीच देशाची संस्कृती आहे. संविधान आल्यानंतरच गुलामगिरीची मानसिकता दूर झाली. संविधानाला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी ही तरुण पिढीची आहे. त्यांनी संविधानाला खोलवर जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.