शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रिकेट’पासून ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्कार

By admin | Updated: November 24, 2015 05:57 IST

अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी

योगेश पांडे ल्ल नागपूरअंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी शेतातील काडीकचऱ्यापासून तयार होणाऱ्या ‘ब्रिकेट’ आणि गोवरी यांचा वापर करून नागपुरात ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला. विशेष म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे करण्यात आला आहे.शहरातील विविध स्मशानघाटांवर अंत्यसंस्कारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ‘एका पार्थिवासाठी किमान एक वृक्ष’ असे समीकरण आहे. हेच वृक्ष वाढविताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लाकडांनीच अंत्यसंस्कार व्हावेत, असे बंधन कुठल्याही धर्मात नसल्याचा दावा करीत नागपुरातील ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला. यातूनच गोवरीच्या माध्यमातून ‘हरीत दहन’ ही संकल्पना समोर आली. २०१४ मध्ये ‘गॅस’ तसेच गोवरीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. २०१४ साली सुमारे २०० मृतदेहांचे या प्रणालीने अंत्यसंस्कार झाले व यामुळे सुमारे ४५० झाडांना जीवदान मिळाले.आता गोवरी दहनाच्या समोर जाऊन संस्थेने ‘अ‍ॅग्रो वेस्ट’पासून तयार होणाऱ्या ‘ब्रिकेट’चादेखील अंत्यसंस्कारांसाठी वापर करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. ‘ब्रिकेट’ हे सोयाबीन, कापूस, तूरसारख्या पिकांच्या कापणीनंतर शेतात उरलेल्या कचऱ्यापासून बनविले जाते. ‘ब्रिकेट’ बाजारात सहजतेने उपलब्ध असून याचा उपयोग उद्योगक्षेत्रात करण्यात येतो. रविवारी नागपुरातील सहकारनगर घाटावर शशिकला भीष्म यांचा अंत्यसंस्कार याप्रकारे करण्यात आला. ‘ब्रिकेट’ची ‘जीसीव्ही’ (ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू) लाकडाइतकीच असल्यामुळे तितकीच उष्णता निर्माण होते. त्यामुळे अंत्यसंस्कारादरम्यान कुठलीही समस्या जाणवली नाही अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.‘ब्रिकेट’चे फायदे४प्रदूषणात घट४अंत्यसंस्कारासाठी कमी खर्च४झाडांची वाचणारी कत्तल४अतिरिक्त इंधनाची आवश्यकता नाही४ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगारनिर्मिती