शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वमध्ये चतुर्वेदींना स्पर्धा मध्यमध्ये दावेदारांची रांग

By admin | Updated: July 15, 2014 01:18 IST

उमेदवार निवडीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीने पाठविलेल्या निरीक्षकांसमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघडपणे गटबाजीचे प्रदर्शन केले.

गटबाजीची रंगीत तालीम : सहाही विधानसभा आटोपल्या नागपूर : उमेदवार निवडीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीने पाठविलेल्या निरीक्षकांसमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघडपणे गटबाजीचे प्रदर्शन केले. पूर्व नागपुरात पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. मध्य नागपुरात माजी मंत्री अनिस अहमद यांना सेटल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना साकडे घातले. तर हलबा समाजाला येथे संधी द्या, असाही आग्रह काहींनी धरला. दोन्ही मतदारसंघात दावेदारांची मोठी रांग पाहायला मिळाली. अ.भा. काँग्रेस समितीचे निरीक्षक विनोद चतुर्वेदी, जेसा मोटवानी यांनी देवडिया भवनात पूर्व व मध्य नागपुरातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. नगरसेवक दीपक कापसे, कुमुदिनी कैकाडे, लोणारे, पुरुषोत्तम हजारे, शेवंता तेलंग, ब्लॉक अध्यक्ष आदींनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. चतुर्वेदींकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. त्यांनाच संधी द्या, या संबंधीचे लेखी पत्रही निरीक्षकांना दिले. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी तानाजी वनवे यांच्यासह रमण पैगवार, नगरसेविका मालुताई वनवे, गणेश शाहू, शोभा मेश्राम, राजू झाडे, धनराज मुळे, महिला काँग्रेसच्या निशा दांडेकर, बेबीनंदा गाडेकर, अ‍ॅड. प्रशांत खोब्रागडे, तुघलक अंसारी, माथाडी संघटनेते रोशन अंसारी, मिलिंद शेंडे, बाबुराव वंजारी, रत्नाकर जयपूरकर आदींनी चतुर्वेदी यांच्या नावाला विरोध केला. तानाजी वनवे यांनी स्वत:चा दावा केला. महापालिकेत काँग्रेसचे उमेदवार पाडण्यात मोठा वाटा आहे, अशी तक्रार शाहू व पैगवार यांनी केली. काँग्रेसचे नवे लोक काम करीत आहेत. या वेळी त्यांच्यापैकी कुणाला तरी संधी द्यावी, अन्यथा पक्ष अडचणीत येईल. येथे जागा जिंकायची असेल तर ओबीसी चेहरा द्या, अशी मागणी करण्यात आली. माजी महापौर नरेश गावंडे यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करीत उमेदवारी देण्याची मागणी केली. याशिवाय अभिजित वंजारी, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष व शहर सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांनीही उमेदवारीसाठी दावा केला.मध्य नागपुरात माजी मंत्री अनिस अहमद यांच्यासाठी सरचिटणीस अतुल कोटेचा, ब्लॉक पदाधिकारी, माजी नगरसेवक भुत्तो, निजाम अली, ओवेस कादरी आदींनी निरीक्षकांना गळ घातली. प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांनीही दावा केला. कमलेश समर्थ, जयप्रकाश पारेख, रामदास पराते, ब्रिजभूषण शुक्ला आदींनी त्यांना पाठबळ दिले. शेख हुसैन व आसीफ कुरेशी हे मुस्लीम समाजाचे वेगवेगळे शिष्टमंडळ घेऊन आले व स्वत:साठी उमेदवारी मागितली. महिला अध्यक्ष आभा पांडे, कांता पराते यांनीही दावा केला. शहर काँग्रेसचे सरचिटणीस विजय पखाले यांच्याासाठी गणपती शाहीद, पुष्पा पवनीकर, अश्वीन अंजीकर, जयमाला बारापात्रे यांनी उमेदवारीची मागणी केली. (प्रतिनिधी)