शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रोडच्या कामामुळे विविध मार्गावर वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:03 IST

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे आदेश : तीन टप्प्यातील रस्त्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आदेश निर्गमित केले आहे.सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये पॅकेज क्रमांक ८ मधील रस्ता क्रमांक ३१, एक स्तंभ चौक ते नार्थ अंबाझरी रोड (अजित बेकरी)दरम्यान सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यामार्गावरील उजव्या बाजूची वाहतूक १४ डिसेंबर २०१९ पर्यंत बंद राहील. याशिवाय पॅकेज क्र. ६ मधील क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा (रस्ता क्र.२१) मार्गावरील उजवीकडील वाहतूक १८ नोव्हेंबर पर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.२ मधील रस्ता क्रमांक ३, आझाद चौक ते अयाचित मंदिर व झेंडा चौक ते सक्करदरा चौक व्हाया जुनी शुक्रवारी दरम्यानची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. गजानन चौक ते सक्करदरा चौक दरम्यानची डाव्या बाजूची वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात येईल.पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १५, नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक दरम्यानची वाहतूक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १३ टेका नाका चौक ते नारी गाव पैकी मार्गावरील वाहतूक १० ऑक्टोबर पर्यंत बंद राहील. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १८ बापुना वाईन शॉप ते गुरूनानक सोसायटी जी कुमार आरोग्यधाम पर्यंतची दोन्ही बाजूची वाहतूक १० ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे. पॅकेज क्र.१ मधील रस्ता क्रमांक १९ कुकरेजा नगर ते कस्तुरबा नगर गल्ली नं. १,२,३,४ कस्तुरबा नगर झोपडपट्टी दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी बंद राहील. सदर मार्गांवरील वाहतूक अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात येईल. यासंबंधीचे आदेश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त