डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन आता कोरियन भाषेतही

By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2026 16:51 IST2026-05-18T16:50:47+5:302026-05-18T16:51:41+5:30

Nagpur : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ऐतिहासिक धम्मक्रांती आणि त्यांचे एकूणच मानवकल्याणकारी विचारधनाने जगभराला भुरळ घातली आहे. त्यामुळे त्यांना अधिकाधिक जाणून घेण्यासाठी जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता असते.

Dr. Babasaheb Ambedkar's thoughts now available in Korean language | डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन आता कोरियन भाषेतही

Dr. Babasaheb Ambedkar's thoughts now available in Korean language

नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ऐतिहासिक धम्मक्रांती आणि त्यांचे एकूणच मानवकल्याणकारी विचारधनाने जगभराला भुरळ घातली आहे. त्यामुळे त्यांना अधिकाधिक जाणून घेण्यासाठी जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता असते. या उद्देशानेच बाबासाहेबांचे सर्व साहित्य कोरियन भाषेत अनुवादित करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण कोरियाचे भंते डॉ. ली ची रान यांनी येथे दिली.

इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन, संघ काया फाउंडेशन, दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, ग्लोबल युनायटेड एज्युकेशन आणि शताब्दी बहुउद्देशीय संस्था सोशल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात आयोजित तीनदिवसीय विश्व शांती परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी श्रीलंकेचे महानायक भंते मदम्पगामा अस्सजी थिसा, भंते प्रशील गौतम नितीन गजभिये, क्षितिज गायकवाड, स्मिता वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध देशांतून आलेल्या भिक्खू आणि बौद्ध प्रतिनिधींनी रविवारी दीक्षाभूमीवर पोहोचून भगवान बुद्ध आणि आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सामूहिक 'त्रिशरण पंचशील' ग्रहण केले. यासोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पल, नागलोक, शांतिवन चिचोलीसह विविध बुद्ध विहारांना भेटी दिल्या. महानायक भंते मदम्पगामा अस्सजी थिसा, अंबलगोडा धम्मलंकारा थेरो, दक्षिण कोरियाचे डॉ. ली ची रान, लाओसचे भंते थेपसाकदा फेतसालाथ, नेपाळचे भिक्षू तपसी धम्म आणि थायलंडच्या सिस्टर अन मिचाई यांच्यासह अनेक जागतिक बौद्ध विचारवंतांनी दीक्षाभूमी, नागलोक आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या गौरवशाली इतिहास व निर्मितीवर चर्चा केली.

बाबासाहेबांचे कार्य युगांतकारी

"दीक्षाभूमी परिसरात पाऊल ठेवताच असीम शांतता आणि सुखाचा अनुभव आला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या या पवित्र भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे जे युगांतरकारी कार्य केले आहे, ते कधीही विसरता येणार नाही."
- महानायक भंते मदम्पगामा अस्सजी थिसा, श्रीलंका

"भंते डॉ. ली ची रान म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आता जगभरात पोहोचत आहे. आपण स्वत: बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एक पुस्तक कोरियन भाषेत काढले आहे. आता बाबासाहेबांचे सर्व साहित्यसुद्धा कोरियन भाषेत काढण्यात येत आहे. तत्पूर्वी कोरियामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही उभारण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले."
- परदेशी पाहुण्यांचे दीक्षाभूमीला नमन
 

Web Title : डॉ. अम्बेडकर के विचार अब कोरियाई में; वैश्विक रुचि बढ़ी।

Web Summary : डॉ. अम्बेडकर के मानवतावादी विचार वैश्विक रुचि आकर्षित करते हैं। उनका साहित्य कोरियाई में अनुवादित किया जा रहा है। कोरिया में एक प्रतिमा स्थापित की गई थी। यह नागपुर में विश्व शांति परिषद में घोषित किया गया, जहाँ अंतर्राष्ट्रीय बौद्ध प्रतिनिधियों ने दीक्षाभूमि पर सम्मान व्यक्त किया, अम्बेडकर की विरासत पर चर्चा की।

Web Title : Dr. Ambedkar's thoughts now in Korean; Global interest surges.

Web Summary : Dr. Ambedkar's humanitarian thoughts attract global interest. His literature is being translated into Korean. A statue was erected in Korea. This was announced at the Vishwa Shanti Parishad in Nagpur, where international Buddhist representatives paid respects at Deekshabhoomi, discussing Ambedkar's legacy.

टॅग्स :nagpurनागपूर