गुमगाव शिवारात ‘डबल मर्डर’

By Admin | Updated: May 3, 2015 02:02 IST2015-05-03T02:02:41+5:302015-05-03T02:02:41+5:30

तालुक्यातील गुमगाव शिवारातील गुमगाव - वडगाव (गुजर) मार्गाच्या कडेला असलेल्या नालीत दोन अनोळखी तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

'Double Murder' in Gumgaon Shivar | गुमगाव शिवारात ‘डबल मर्डर’

गुमगाव शिवारात ‘डबल मर्डर’

हिंगणा : तालुक्यातील गुमगाव शिवारातील गुमगाव - वडगाव (गुजर) मार्गाच्या कडेला असलेल्या नालीत दोन अनोळखी तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या दोघांच्या डोक्याला खोल जखमा असल्याने त्यांचा इतरत्र खून करून मृतदेह गुमगाव शिवारात फेकले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे दोन्ही मृतदेह शनिवारी दुपारी ३च्या सुमारास आढळून आले.
गुमगाव - वडगाव (गुजर) मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांना या मार्गाच्या कडेला दोन तरुणांचे मृतदेह पडले असल्याचे आढळून आले. नागरिकांनी लगेच सदर प्रकाराची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. या संदर्भात हिंगण्याचे ठाणेदार दीपक वानकडे यांनी सांगितले की, दोघेही तरुण अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोघांच्याही डोक्याला सहा बाय दोन इंच खोल जखमा असून, शरीरावर कुठेही जखमा नाहीत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर जाड्या लोखंडी रॉडने प्रहार केला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
दोघेही राजस्थानातील रहिवासी आणि ट्रकचालक व वाहक असावे. ते या परिसरात ट्रक घेऊन आले असावे. त्यातच अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवून डोक्यावर ट्रकमधील रॉडने प्रहार करून त्यांचा खून केला असावा. त्यानंतर दोघांचेही मृतदेह गुमगाव शिवारात फेकून ट्रक घेऊन पळून गेले असावे, असा अंदाज दीपक वानखडे यांनी व्यक्त केला. एकाची उंची पाच फूट असून, गौर वर्ण आहे. त्याच्या उजव्या हातावर ‘उरोसिंह गुरधर’ असे गोंदलेले आहे. दुसरा तरुण सावळ्या वर्णाचा असून, त्याच्या हातावर ‘संजय ऊर्फ संजयसिंह गारवाल’ असे गोंदलेले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Double Murder' in Gumgaon Shivar