प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या भूलथापांना बळी पडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:10 AM2020-05-29T00:10:59+5:302020-05-29T00:12:28+5:30

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेथेजेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असून कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Don't fall prey to misconceptions about restricted areas! | प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या भूलथापांना बळी पडू नका!

प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या भूलथापांना बळी पडू नका!

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेथेजेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असून कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्ततुकाराम मुंढे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार यापूर्वी अखेरचा रुग्ण निगेटिव्ह आल्यापासून पुढील २८ दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र ठेवावे लागत होते. आता १७ मे रोजी आलेल्या नवीन गाईडलाईननुसार संबंधित परिसरात अखेरचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या दिवसापासून पुढील २८ दिवस ते क्षेत्र प्रतिबंधित राहील. या गाईडलाईननुसारच नागपुरात अंमलबजावणी सुरू आहे. हे निर्णय शासनाचे आहेत. विशेष म्हणजे यामागे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारण आहे. २८ दिवसाला १४ आणि १४ अशा दोन भागात वैद्यकीय दृष्ट्या विभागण्यात आले आहे. पहिले १४ दिवस अ‍ॅक्टिव्ह आणि नंतरचे १४ दिवस पॅसिव्ह असे हे वर्गीकरण आहे. जो रुग्ण पॉझिटिव्ह आला त्या रुग्णाच्या परिसरातील ९५ टक्के लोकांना २ ते १४ दिवसात कोरोनाची लागण होऊ शकते. उरलेल्या पाच टक्क्यांपैकी अडीच टक्के लोकांना ० ते २ दिवसादरम्यान तर उर्वरीत अडीच टक्के लोकांना १४ व्या दिवसानंतर २८ व्या दिवसापर्यंत लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडीच टक्क्याच्या शक्यतेमुळे २८ दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित ठेवणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. नागपूर लवकर कोरोनामुक्त होऊन कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये यावा, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Web Title: Don't fall prey to misconceptions about restricted areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.